
लातूर : मराठा आरक्षणासाठी राज्यातील आत्महत्यांच्या संख्येत वाढ होत असून आता लातूर तालुक्यातील बोरगाव (काळे) गावातील तरुणाने आत्महत्या केली आहे. गोविंद मधुकर देशमुख असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे. स्वत च्या शेतात गळफास लावून आपलं जीवन संपवलं आहे.
मराठा आरक्षणासाठी 2 जानेवारीपर्यंतचा वेळ
अनेक दिवसांपासून सुरु असलेलं मनोज जरांगे यांचं उपोषण अखेर स्थगित केलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ देण्याची तयारी दर्शवली. त्यांनी त्यांचं उपोषण अखेर मागे घेतलं. सरकारच्या शिष्टमंडळाने अंतरवली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. 2 जानेवारीपर्यंतचा वेळ मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.