कांदा जोमात, दर कोमात; आवक वाढली पण उत्पादकांची परवड

कांद्याच्या लहरी दराचा प्रत्यय गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील शेतकऱ्यांना येत आहे. सद्यस्थितीत उन्हाळी कांद्याची आवक सुरू असली तरी दरात झालेली घट अद्यापही कायम आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला 4 ते 5 रुपये किलो असा दर मिळत आहे( Loss of growers due to increase in onion import).

    नागपूर : कांद्याच्या लहरी दराचा प्रत्यय गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील शेतकऱ्यांना येत आहे. सद्यस्थितीत उन्हाळी कांद्याची आवक सुरू असली तरी दरात झालेली घट अद्यापही कायम आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला 4 ते 5 रुपये किलो असा दर मिळत आहे( Loss of growers due to increase in onion import).

    हंगामाच्या सुरवातीला हाच कांदा 3o ते 40 रुपये किलोने विकला गेला होता. निसर्गाचा लहरीपणा त्यामध्येच कांदा दराची अशी परवड यामुळे कांद्याचा वांदा तर झालाच आहे शिवाय निसर्गामुळे उत्पादनात घट तर कधी बाजारपेठेतील दराची अनियमितता यामुळे शेतकरी त्रस्त आहे.

    व्यापारीच मालामाल

    उन्हाळी हंगामातील कांद्या काढणीची कामे जोमात सुरु आहेत. भर उन्हात कांदा काढणी, छाटणी ही कामे उरकली जात आहेत. त्यामुळे कांद्याची आवक सुरु होताच थेट दरावरच परिणाम होणार आहे. कांदा लागवडीपासून ते काढणीपर्यंत शेतकऱ्यांचाच अधिकचा खर्च झाला आहे. ठोक बाजारात दर नसले तरी किरकोळ विक्रेत्यांच्या माध्यमातून व्यापारी अधिकचा नफा कमावत आहे. शेतकऱ्यांना मात्र कवडीमोल दरातच विक्री करावी लागत आहे.

    शेतकरी वाऱ्यावर

    इतर वेळी कांदा दरात वाढ झाली तर ग्राहकांना तो कांदा खरेदी करता यावा म्हणून नाफेड कांदा विक्री करतो. मात्र, आता शेतकऱ्यांना कमी दर मिळत असताना नाफेडने अधिकच्या किंमतीमध्ये कांदा खरेदी करणे क्रमप्राप्त असताना याकडे दुर्लक्ष होत आहे.

    अनुदानाची मागणी

    कांद्याचे दर घटताच किमान लागवड खर्च आणि केलेले परिश्रम याचे चीज होण्यासाठी सरकारने कांदा उत्पादकांनी अनुदान देण्याची मागणी केली आहे. 30 रुपये किलो हा हमीभाव देण्याची मागणी कांदा उत्पादक संघटनेने केली आहे.