संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

मरकुरी प्लास्टो कंटेनर, रसलपूर या द्राक्ष व डाळिंब बॉक्स बनवणाऱ्या कंपनीचे सिमेंटचे पत्रे गारांमळे फुटल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. निफाडजवळील रसलपूर शिवारामध्ये द्राक्ष व डाळिंब पॅकिंगसाठी लागणारे खोके बनवणाऱ्या मरकुरी प्लास्टो कंटेनर या कंपनीचे गारपिटीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

    निफाड : मरकुरी प्लास्टो कंटेनर, रसलपूर या द्राक्ष व डाळिंब बॉक्स बनवणाऱ्या कंपनीचे सिमेंटचे पत्रे गारांमळे फुटल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. निफाडजवळील रसलपूर शिवारामध्ये द्राक्ष व डाळिंब पॅकिंगसाठी लागणारे खोके बनवणाऱ्या मरकुरी प्लास्टो कंटेनर या कंपनीचे गारपिटीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

    बॉक्स बनवण्यासाठी लागणारा कच्चामाल, कागदाचे रोल व कंपनीची मशिनरी भिजल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे; तर गेल्या तीन दिवसांपासून काम बंद असल्याने कामगार बसून आहेत. गारांचा मारा झाल्यामुळे पत्र्यांची चाळणी झाली आहे. यातून पावसाचे पाणी व गारांचा कंपनीच्या शेडमध्ये साचल्यामुळे बॉक्स बनविण्यासाठी लागणारे रोल व कच्चामाल ओला झाला आहे.

    अचानक आलेला वादळी वारा आणि तूफान झालेल्या गारपिटीने आम्ही घाबरून गेलो होतो. गारांचा आकार संत्र्याएवढा असल्याने काही वेळात पत्र्यांना होल पडून पावसाचे पाणी कंपनीमध्ये आत आल्याने मशिनरी व कच्चामाल पूर्ण ओला झाल्याचे सुपरवायझर हरिदास तांबरे यांनी सांगितले.