हरवलेली मुले आई-वडीलांच्या ताब्यात, कुटूंबियांच्या डोळ्यात आनंद आश्रू

घरासमोर खेळत असताना अचानक दोन मुले बेपत्ता झाली अन् कुटूंबाचा जीव धोक्यात पडला. धावपळ केली अन् मुंढवा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी काही तासात मुलांचा शोध लावत त्यांना त्यांच्या आई-वडीलांच्या स्वाधीन केले. हरवलेली मुलांना सुखरूप पाहून कुटूंबियांच्या डोळ्यात आनंद आश्रू दरवळले.

    पुणे : घरासमोर खेळत असताना अचानक दोन मुले बेपत्ता झाली अन् कुटूंबाचा जीव धोक्यात पडला. धावपळ केली अन् मुंढवा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी काही तासात मुलांचा शोध लावत त्यांना त्यांच्या आई-वडीलांच्या स्वाधीन केले. हरवलेली मुलांना सुखरूप पाहून कुटूंबियांच्या डोळ्यात आनंद आश्रू दरवळले.

    केशवनगर येथे रहाणार्‍या चैताली मोरे व सुधीर मोरे यांची मल्हार मोरे (४) आणि रोहीत मोरे (३) दोन मुले घरासमोर खेळत होती. खेळता- खेळता ते रस्ता भरकटले आणि ती रस्ता चुकली. कुटूंबाने पाहणी केली असता त्यांना परिसरात कुठेच मुले दिसेनासी झाली. त्यामुळे त्यांची धावपळ उडाली.

    घाबरलेल्या अवस्थेत कुटूंबाने केशवनगर पोलीस चौकी गाठली. तेथील चौकी अधिकारी उपनिरीक्षक धनजंय गाडे यांना माहिती दिली. त्यांनी धीर देत त्यांच्याकडे विचारपूस केली. मुलांचे वय लक्षात घेत घटनेचे गांर्भिय ओळखले व वरिष्ठ निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांना याची माहिती दिली. या घटनेची दखल घेवून ताम्हाणे यांनी मुलांचे फोटो मागवले. तसेच, हद्दीतील सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करून शोध घेण्याचे आव्हान केले. पोलीस अमंलदार सचिन बोराटे, प्रविण कोकणे, निलेश पालवे यांच्या पथकाने शिवाजी चौक, पवार वस्ती, कुंभार वाडा, नदीपात्र येथे शोध घेतला. त्यावेळी मुले कुंभारवाडा नदीपात्रात घाबरलेल्या अवस्थेत उभी असल्याचे दिसले. त्या मुलांना अमंलदार केशवनगर पोलीस चौकीत आणले. त्यानंतर मुलांच्या आई-वडीलांना मुलांना सुपुर्त केले. यावेळी मुलांना पाहुन त्यांच्या आई-वडीलांच्या डोळ्यातून पाणी टपकले. ही कामगिरी पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांनी ही कारवाई केली.