डिव्हाईन कंपनीतील दुर्घटनेस ठेकेदार जबाबदार; कंपनीचा दावा

या कामगारांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च कंपनीने व्यवस्थापनाने उचलला. ज्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्या ठेकेदाराने मरणयातना भोगणाऱ्या कर्मचाऱ्यांची काळजीही घेतली नसल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

  चिपळूण : खेड तालुक्यातील (Khed Tehsil) लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये (Lote MIDC Case) असलेल्या डिव्हाईन केमिकल कंपनीत (Devine Chemical Company) झालेल्या दुर्घटनेस ठेकेदाराचा बेजबाबदारपणा (Irresponsibility of the contractor) असल्याचे दिसून येत आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच त्याचे चार कामगार व फर्निचर कामगार अडचणीत आले, असा दावा डिव्हाईन कंपनीने केला आहे.

  तर या अपघातात जखमी झालेल्या एका कामगाराने सांगितले की, ठेकेदार दीपक महाडिक यांनी वेल्डिंगचे काम करताना काळजी घेतली असती तर हा अपघात टळला असता, असे या कामगाराने म्हटले आहे. दरम्यान, या दुर्घटनेचा विभागाचा अहवाल अजून समोर आलेला नाही. या प्रकरणी खेड पोलीस (Khed Police) अधिक तपास करत आहेत.

  रविवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या च्या सुमारास लोटे येथील डिव्हाईन केमिकल कंपनीत स्फोट झाला. या दुर्घटनेत सात कामगार जखमी झाले. या कामगारांना सुरुवातीला लोटे येथील जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, या कामगारांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना अधिक उपचारासाठी नवी मुंबईतील नॅशनल बर्न रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान ६ कामगारांचा मृत्यू झाला.

  याबाबत कंपनी व्यवस्थापनाने आपली बाजू मांडताना म्हटले आहे की, या कामगारांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च कंपनीने व्यवस्थापनाने उचलला. ज्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्या ठेकेदाराने मरणयातना भोगणाऱ्या कर्मचाऱ्यांची काळजीही घेतली नसल्याचेही कंपनीने म्हटले आहे. मात्र, संबधित विभाग व अन्य संस्था डिव्हाईन कंपनीलाच दोष देत असून, या दुर्घटनेला ठेकेदार जबाबदार नाही का? असा सवाल कंपनीने उपस्थित केला आहे.

  तर कंपनीने पुढे म्हटले आहे की, फॅब्रिकेशन आणि वेल्डिंगची वर्कऑर्डरही कंपनी व्यवस्थापनाने दीपक महाडिक यांच्या कंपनीच्या नावावर केली होती. मात्र, महाडिक यांनी जुने नाते सांगून वर्कऑर्डर घेण्यास नकार दिला होता. मात्र, कंपनीत महाडिक यांनी स्वत:ची वेल्डिंग मशिनरी आणि चार कामगारांसह स्वतंत्र तपासणी, देखरेख आणि नियंत्रणाखाली १२ नोव्हेंबरपासून पार्टीशनचे काम सुरू केले होते.

  कंपनी व्यवस्थापनाचा आरोप आहे की, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी एका छोट्या स्टोअर हाऊसमध्ये काही केमिकलचे ड्रम सुरक्षितपणे ठेवण्यात आले होते. फॅब्रिकेशनचे काम करणाऱ्या ठेकेदार आणि त्याच्या कामगारांनी वेल्डिंगचे काम अतिशय सुरक्षितपणे करायला हवे होते. त्यांनी लक्ष दिले असते तर हा अपघात झाला नसता, असे कंपनी व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

  अशा कंत्राटदाराला सर्व कंपन्यांनी काळ्या यादीत टाकावे, जे स्वत:च्या माणसांसह, यंत्रसामग्रीसह आणि सूचनांसह अपघात घडवून आणतात आणि नंतर फरार होतात किंवा स्वत:च्या कामावर घेतलेल्या कामगारांची जबाबदारी घेत नाहीत आणि कंपनीला जबाबदार धरण्यासाठी खोट्या सबबी सांगण्याचा प्रयत्न करतात.