संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

गॅस गळतीनंतर (Gas Leakage) आग लागून सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे आगीचा भडका होऊन 3 घरांना आगीने विळख्यात घेतले. तिन्ही घरातील घरगुती साहित्यांची अक्षरश: राखरांगोळी झाली. उत्तर नागपुरातील महर्षी दयानंदनगरात गुरुवारी सायंकाळी (Nagpur Crime) ही घटना घडली.

    नागपूर : गॅस गळतीनंतर (Gas Leakage) आग लागून सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे आगीचा भडका होऊन 3 घरांना आगीने विळख्यात घेतले. तिन्ही घरातील घरगुती साहित्यांची अक्षरश: राखरांगोळी झाली. उत्तर नागपुरातील महर्षी दयानंदनगरात गुरुवारी सायंकाळी (Nagpur Crime) ही घटना घडली. रहिवाशांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविल्याने अधिक नुकसान टळले.

    महर्षी दयानंदनगरातील दयानंद पार्कजवळ शितलप्रसाद, लतेलप्रसाद व डागाप्रसाद या तिन्ही धकाते भावंडांची लगतच घरे आहेत. सायंकाळी सातच्या सुमारास शितलप्रसाद धकाते यांच्या पत्नी सीमा स्वयंपाक करत होत्या. कुकर गॅसवर लावून त्या बाहेरच्या खोलीत गेल्या. त्याचवेळी स्वयंपाकघरात सिलेंडरचा स्फोट झाला. प्रसंगावधान राखत सीमा घराबाहेर आल्या. गॅसमुळे तेलप्रसाद व डागाप्रसाद यांच्या घरांनाही आगीने कवेत घेतले. आगीचे लोळ दिसताच शेजारच्या नागरिकांनी आगीवर पाणी टाकण्याचा प्रयत्न केला.

    दरम्यान, आगीची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन विभागाच्या सुगतनगर येथून 2 तर गंजीपेठ व सिव्हील लाईन येथून प्रत्येकी 1 अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन जवानांनी तत्काळ पाण्याचा मारा सुरू केला.

    महर्षी दयानंद नगरातील घटना

    लगतच्या घरांमध्ये आणखी सिलिंडर असल्याने त्यांचाही स्फोट होण्याची भीती होती. त्यामुळे अग्निशमन जवानांना मोठी कसरत करावी लागली. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. परंतु, तिन्ही घरातील टीव्ही, फ्रिज, कागदपत्रे, किराणा, धान्य घरगुती साहित्यांची राखरांगोळी झाली.