घोडेगावात जनावरांना लम्पी लसीकरण सुरु

आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव परिसरातील जनावरांना लम्पी लसीकरण मोफत सुरु करण्यात आले आहे अशी माहिती सरपंच क्रांतीताई गाढवे आणि उपसरपंच सोमनाथ काळे यांनी दिले.

    मंचर :  आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव परिसरातील जनावरांना लम्पी लसीकरण मोफत सुरु करण्यात आले आहे अशी माहिती सरपंच क्रांतीताई गाढवे आणि उपसरपंच सोमनाथ काळे यांनी दिले. ग्रामपंचायत घोडेगाव हद्दीतील जनावरांना लम्पी लसीकरण देण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. सदर लसीकरण हे शशिकला चिखले, सरपंच क्रांतीताई गाढवे, उपसरपंच सोमनाथ काळे यांच्या सहकार्याने सुरु करण्यात आले आहे .लसीकरण मोहिमेसाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल चिखले तसेच समीर घोडेकर यांचे सहकार्य लाभले. यावेळी संदीप काळे,मंजुनाथ काळे ,रघुनाथ काळे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.