माणमध्ये लम्पीचा शिरकाव, पशुसंवर्धन विभाग सतर्क; लसीकरणला वेग

माण तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. सध्या तालुक्यात परतीच्या पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. सर्वञ हिरवा चारा उपलब्ध असल्याने दुधाचे प्रमाणही वाढले आहे. त्यातच लंम्पी त्वचा रोगाचा तालुक्यात शिरकाव झाल्याने पशुधन मालकात भितीचे वातावरण पसरले आहे.

    माण : माण तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. सध्या तालुक्यात परतीच्या पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. सर्वञ हिरवा चारा उपलब्ध असल्याने दुधाचे प्रमाणही वाढले आहे. त्यातच लंम्पी त्वचा रोगाचा तालुक्यात शिरकाव झाल्याने पशुधन मालकात भितीचे वातावरण पसरले आहे. नुकतेच मोही, पिंगळी बुद्रुक ता. माण येथील शेतकऱ्यांच्या गायीला लम्पी त्वचा रोगाची लक्षणे आढळुन आली असल्याने पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे.

    पशुसंवर्धन विभागामार्फत मोही, पिंगळी बुद्रुक येथील बाधीत परिसरापासून पाच किलोमीटर अंतरावरील परिसरातील सर्व जनावरांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. माण तालुक्यात सध्या ८० हजार ६५ जनावरे असून पशुसंवर्धन विभागाचे तालुक्यात १४ दवाखाने आहेत. यापैकी ११ ठिकाणी पशुवैद्यक काम करत आहेत. तीन ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात पशुवैद्यकांची नेमणूक करण्यात आली आहे.

    दरम्यान त्यामुळे खाजगी पशुवैद्यकांना सोबत घेऊन पशुसंवर्धन विभाग लम्पीला सामोरे जात आहे. तालुक्यातील कोणत्यांही जनावरास लम्पीची लक्षणे आढळून आल्यास पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे अवाहन पशुसंवर्धन अधिकारी डाॅ आरीफ इनामदार यांनी केले आहे.