Madhya Pradesh and Maharashtra get relief due to Supreme Court verdict! Now it is possible to give reservation to OBCs

वीस ते पंचवीस दिवसाच्या आत इम्पेरिकल डेटा मिळेल अशा पद्धतीने आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी मसुदा ( format ) तयार केला असून त्याही पुढे जाऊन सॉफ्टवेअर तयार करणे आणि डाटा एन्ट्रीच्या माध्यमातून निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या शासनाच्या सर्व यंत्रणा कामाला लावून वीस ते पंचवीस दिवसात इम्पेरिकल डेटा मिळू शकेल असा हरिभाऊ राठोड यांनी दावा केला आहे.

    सर्वोच्च न्यायालयाने दिनांक १७ मे २०२२ रोजी दिलेल्या निर्देशानुसार सर्व हक्क राज्य निवडणूक आयोगाला मिळाला आहे. पावसाळ्याचा अंदाज घेऊन निवडणूका घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने  सुतोवाच केलेला आहे. राज्य निवडणूक आयोगाद्वारे वार्ड रचना करण्यासाठी कमीत कमी पंधरा दिवस आणि मतदार यादी दुरुस्त करण्यासाठी एक महिन्याचा वेळ लागेल.

    दरम्यान वीस ते पंचवीस दिवसाच्या आत इम्पेरिकल डेटा (imperical data)  मिळेल अशा पद्धतीने आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी मसुदा ( format ) तयार केला असून त्याही पुढे जाऊन सॉफ्टवेअर (software) तयार करणे आणि डाटा एन्ट्रीच्या माध्यमातून निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या शासनाच्या सर्व यंत्रणा कामाला लावून वीस ते पंचवीस दिवसात इम्पेरिकल डेटा (imperical data)  मिळू शकेल असा हरिभाऊ राठोड यांनी दावा केला आहे.

    इम्पेरिकल डेटा (imperical data) गोळा करण्यासाठी श्री बांटीया यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आला आहे, त्या आयोगाला २४ मे रोजी कोकण भवन येथे आयुक्त कार्यालय येथे सविस्तर डेमो सादर करून  इम्पेरिकल डेटा (imperical data)  कसा मिळवावा या संदर्भात तज्ञांशी चर्चा करण्यात येईल असे हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.