मध्यप्रदेश सीमावाद; सुविधा मिळत नसल्याने बुलढाण्यातील ४ गावांचा राज्य सरकारला इशारा

गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४० गावांवर दावा सांगितला आहे. तसेच, सोलापुरातही हक्क दाखवला आहे. दरम्यान, सोलापुरातील काही गावांनी राज्य सरकार कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे.

    बुलढाणा : कर्नाटकनंतर (Karnataka) आता मध्यप्रदेश सीमावाद (Madhaya Pradesh) प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. बुलढाण्यातील ४ गावांनी राज्य सरकारला (Maharashtra Government) इशारा दिला आहे. मुलभूत सुविधा मिळत नसल्याचा या गावकऱ्यांनी आरोप केला आहे.

    गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४० गावांवर दावा सांगितला आहे. तसेच, सोलापुरातही हक्क दाखवला आहे. दरम्यान, सोलापुरातील काही गावांनी राज्य सरकार कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे.

    बुलढाण्यातील (Buldhana) ४ गावांनी मध्यप्रदेशात जाण्याचा निर्णय घेतला आहे. पाणीप्रश्न, आरोग्य सुविधा, शिक्षण या सारख्या मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप या गावकऱ्यांनी केला आहे.