यारी रोड-वर्सोवा येथे साकारला मद्रासच्या मंदिराचा देखावा; नवरात्रौत्सवात सर्वधर्मीयांचा सहभाग

सर्वधर्मीयांचा नवरात्रौत्सव म्हणून ख्याती असलेल्या श्री गणेश साई मंदिर ट्रस्टने यारी रोड, वर्सोवा येथे यंदा भव्य मद्रासच्या मंदिराचा देखावा गणेश साई मंदिरालगत साकार केला आहे. यंदा येथील नवरात्रौत्सवाचे ३७ वे वर्ष आहे. कोविड निर्बध राज्य सरकारने मुक्त केल्यानंतर यंदा दोन वर्षांनी येथे सालाबादप्रमाणे साजरा करण्यात येणारा नवरात्र उत्सव याही वर्षी मोठ्या उत्साहाने साजरा होत असल्याची माहिती श्री गणेश साई मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विकास पाटील यांनी दिली.

    मुंबई : येथे साकारलेल्या मद्रासच्या मंदिराचा देखाव्यात सिहांवर आरूढ झालेली १० फूटी दुर्गामतेची मूर्ती मालाडचे मूर्तीकार विकास राठोड यांनी साकरली आहे.तर कलादिग्दर्शक संतोष जाधव यांनी येथे आकर्षक मद्रासचे मंदिर साकारले आहे. तर आकर्षक विद्युत रोषणाई व मंडप डेकोरेशन जगदीश पवार यांनी केले आहे.

    नवसाला पावणारी म्हणून ख्याती असलेल्या येथील दुर्गातेची घटस्थापना व देवीची पूजा वर्सोवा विधानसभा क्षेत्राच्या स्थानिक आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी केली. यावेळी विकास पाटील तसेच माजी नगरसेवक योगीराज दाभाडकर व माजी नगरसेविका रंजना पाटील उपस्थित होते.

    श्री गणेश साई मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विकास पाटील यांनी वेळी असे सांगितले श्री गणेश साई मंदिराचे यंदा ३७ वे वर्ष असून दररोज साधरणतः ८ त १० हजार भाविक दर्शनाचा लाभ घेतात. यावेळी कोळी बांधवही मोठ्या संख्यने उपस्थित असतात. येथील खास वैशिष्ट्य म्हणजे मंदिर आणि मदीना मस्जिद आजू बाजूला असून मोठ्या संख्येने अल्पसंख्याक बांधवांसह सर्व जाती धर्माचे नागरिक येथील नवरात्रौत्सवात सामील होतात.

    रात्री सर्वासाठी मोफत गरब्याचे आयोजन असते व त्यात गरीब श्रीमंत व जाती धर्माचा विचार न करता हजारो गरबा प्रेमी गरब्याचा आनंद घेतात. येथील देवीच्या दर्शनाला अनेक खासदार व आमदार तसेच माजी नगरसेवक भेट देतात. देवीचे दसऱ्याच्या दिवशी मोठ्या उत्साहाने वर्सोवा मढजेट्टी येथे रात्री विसर्जन होते.

    विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी मंडळाचे कार्यकर्ते अजित पाटील, विनीत पाटील, सुरेंद्र जोईल, उमेश मळगावकर येथील नवरात्रौत्सव साजरा करण्यासाठी मेहनत घेत आहेत.