श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील श्रीराम मंदिरात मनसे आणि शिवसेनेकडून महाआरती

महाआरतीला शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, सागर जेधे संतोष चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

    डोंबिवली : अयोध्येत श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर आज देशभरात उत्साहात वातावरण दिसून येत आहे. डोंबिवलीमध्ये मनसे आणि शिवसेनेकडून डोंबिवलीत महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. बाजीप्रभू चौकातील श्रीराम मारुती मंदिरात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होत. या महाआरतीत मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर शहर अध्यक्ष राहुल कामत कल्याण ग्रामीण मनसे पदाधिकारी योगेश पाटील सह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी शेकडो डोंबिवलीकरांनी सहभाग घेतला होता. आरती नंतर जय श्रीरामच्या घोषणेने परिसर दणाणून गेला होता यावेळी राहुल कामत यांनी सांगितले की इव्हेंट न करता कारसेवकांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी त्यासाठी महाआरती आम्ही केली आहे.

    अयोध्येत सुरू असलेल्या श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त डोंबिवलीत देखील उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. डोंबिवली शिवसेना शहर शाखेच्या वतीने डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकात असलेल्या श्रीराम मारुती मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या महाआरतीला शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, सागर जेधे संतोष चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. महाआरती, शंखनाद, जय श्रीरामाच्या घोषणामुळे परिसरात राममय वातावरण निर्माण झालं होतं.