महाबळेश्वर पालिकेची आरक्षण सोडत जाहीर

निवडणूक निर्णय अधिकारी रामहरी भोसले (Ramhari Bhosale) यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पालिका सभागृहात गिरीस्थान नगरपरिषदेचे दहा प्रभागासाठीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी इतर मागासवर्गीयांचे आरक्षण वगळून अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठीचे आरक्षण सोडत पध्दतीने जाहीर करण्यात आले.

    महाबळेश्वर : निवडणूक निर्णय अधिकारी रामहरी भोसले (Ramhari Bhosale) यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पालिका सभागृहात गिरीस्थान नगरपरिषदेचे दहा प्रभागासाठीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी इतर मागासवर्गीयांचे आरक्षण वगळून अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठीचे आरक्षण सोडत पध्दतीने जाहीर करण्यात आले. यावेळी शहरातील असंख्य राजकीय मंडळींनी हजेरी लावली.

    निवडणूक आयोगाने इतर मागासवर्गीयांचे आरक्षण वगळून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या गटाचे आरक्षण सोडत पध्दतीने जाहीर करण्याचे आदेश पालिलकेला दिले होते. त्यानुसार पालिका सभागृहात ही सोडत काढण्यात आली. प्रारंभी प्रभाग 6 मधील दोन जागांपैकी एक जागा व प्रभाग 8 मधील दोन जागांपैकी एक जागा ही लोकसंख्येच्या प्रमाणामुळे अनुसूचित जातीसाठी तर प्रभाग क्रमांक पाचमधील एक जागा ही अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आल्याचे मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी जाहीर केले.

    प्रभाग क्र 6 व प्रभाग क्र 8 मधील एक जागा यापैकी अनुसूचित जातीच्या महिला या गटासाठी कोणता प्रभाग आरक्षित ठेवायचा याचा निर्णय सोडत पध्दतीने घेण्यात आला. विदयार्थ्याच्या हाताने चिठ्ठी उचलून निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रभाग क्र 6 हा अनुसूचित जाती महिलासाठी राखीव करण्यात आला. त्यामुळे प्रभाग क्र 8 एक जागा अनुसूचित जातीच्या खुल्या गटासाठी जाहीर करण्यात आला.