सुट्ट्यांमुळे बहरले महाबळेश्‍वर, पाचगणी; नाताळ, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटनस्थळे सज्ज

मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरला नाताळ सणाचे आगमन नववर्षाच्या निमित्ताने पर्यटकांची हळूहळू गर्दी वाढू लागली आहे. महाबळेश्वर वासियही या पर्यटकांसाठी आता सज्ज झाले आहे.

  पाचगणी : मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरला नाताळ सणाचे आगमन नववर्षाच्या निमित्ताने पर्यटकांची हळूहळू गर्दी वाढू लागली आहे. महाबळेश्वर वासियही या पर्यटकांसाठी आता सज्ज झाले आहे. सध्या महाबळेश्वर जवळपास आता ७५ टक्के फुल्ल झाले असून, महाबळेश्वरला हाऊसफुलचा बोर्ड येत्या दोन ते तीन दिवसानंतर लागण्याची शक्यता आहे.

  अल्हाददायक वातावरणात महाबळेश्वरच्या पर्यटनची मजा लुटण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने पर्यटक पाचगणी महाबळेश्वरला दाखल होऊ लागले आहेत. महाबळेश्वरला पर्याय म्हणून आता पर्यटक तापोळा, पाचगणीकडे पहात आहेत. महाबळेश्वरलगत असणाऱ्या तापोळा, बामणोली, कास पर्यटन, सह्याद्रीनगर परिसरातील कृषी पर्यटन, सायघर कृषी पर्यटन, पर्वतरांगांमधील रिसॉर्ट, हॉटेल, बंगल्यात पर्यटक गर्दी करू लागले आहेत.

  महाबळेश्वरातील वेण्णालेक केटस पॉइंट, बॉम्बे पॉईंट, लॉडविक पॉईंट, विल्सन पॉईंट, पाचगणीमधील पारसी पॉईंट, सिडनी पॉइंट, टेबल लँड आदी परिसर पर्यटकांनी गजबजून गेला आहे. संध्याकाळी पाचगणी, महाबळेश्वरच्या बाजारपेठा फुलल्या आहेत

  बाजारपेठ गर्दीने फुलली

  नाताळाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या गर्दीने फुललेल्या महाबळेश्‍वरच्या बाजारपेठासह प्रेक्षणीय पॉईंट्स पर्यटकांनी गजबजले आहेत. पर्यटकांच्या आगमनांसाठी सर्व हॉटेल्स सजले आहेत. पाचगणी, महाबळेश्वर येथील हॉटेल व्यवसायिक पर्यटकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी सज्ज आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये विविध सेलिब्रिटींचे आतापासूनच आगमन होऊ लागले आहे. जागतिक पर्यटन स्थळ म्हणून पाचगणीची संपूर्ण जगभरात ओळख आहे.

  पाचगणीत नाताळनिमित्त कार्यक्रम

  नाताळ निमित्त महानगरांमधील शाळांना सुट्ट्या लागल्याने पाचगणी येथे पर्यटकांची माेठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. येथील जून्या सन १८७६ मधील चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे. या चर्चमध्ये देश, विदेशातील पर्यटक नाताळ निमित्त भेट देण्यासाठी येतात. येथे रात्री १२ वाजता प्रार्थनासह विविध कार्यक्रम हाेणार आहेत.

  नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत म्हणजे महाबळेश्वर पाचगणीसाठी परवनी असते त्यामुळे महाबळेश्वर येथील वेण्णा लेक चे बोटिंग क्लब, टेबल लँड येथील घोडा गाडी हॉर्स, रायडिंग तसेच तापोळा बामनोली परिसरातील वासोटा पर्यटन शिवसागर जलाशयातील बोटिंग क्लब आधी सर्व दर्जेदार पर्यटनासाठी पर्यटकांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत.

  - अर्षद मेमन, डायरेक्टर, हॉटेल द क्लिफ