
पिकअप मध्ये बसलेले सर्व प्रवासी बाहेर फेकले गेले आणि त्यामध्ये कुलवंती अशोक राऊत वय 60 राहणार मुठवाली महाड या महिलेचा जागीच मृत्यू झाला.
महाड : महाड तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर नांगलवाडी परिसरात एक पिकप टेम्पो दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात एक महिलेचा मृत्यू तर सहा जण जखमी झाल्याची घटना रविवार २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.
एमआयडीसी पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार अमोल अनंत रेशीम राहणार मुठवली हा आपल्या ताब्यातील पिकप टेम्पो क्रमांक MH 06 BG 4216 घेऊन पोलादपूर कडून मुंबईच्या दिशेने जात असताना एकेरी मार्गीका सुरू असताना देखील चुकीच्या दिशेने जात असताना समोरून योग्य बाजूने येणाऱ्या वाहनाला चुकवताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजकाला धडकून पलटी झाली.
यामुळे पिकअप मध्ये बसलेले सर्व प्रवासी बाहेर फेकले गेले आणि त्यामध्ये कुलवंती अशोक राऊत वय 60 राहणार मुठवाली महाड या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर सुहास मधुकर साळवी, अरुण लक्ष्मण चोरगे, ज्ञाननंदकुमार मेहता, नंदिनी नंदकुमार पालव, शीतल सुभाष राऊत, अमोल अनंत रेशीम सर्व राहणार मूठवली महाड हे सहाजण जखमी झाले आहेत. सर्वांना तातडीने महाड ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेचा अधिक तपास एमआयडीसी पोलीस ठाणेमार्फत तपास सुरू आहे.