पुण्यात होणार “महाराष्ट्र अमृत कलश संकलन”; भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची उपस्थिती

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर राबविलेल्या 'मेरी माटी मेरा देश' या अभियानातील अमृत कलशाचे एकत्रीकरण 26 सप्टेंबर रोजी पुण्यात होणार आहे. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत.

    पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर राबविलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानातील अमृत कलशाचे एकत्रीकरण 26 सप्टेंबर रोजी पुण्यात होणार आहे. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत.

    कॉलेज ऑफ इंजिनियरिंग येथे दुपारी 4 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) महाराष्ट्र, आणि नेहरू युवा केंद्र संघटन यांच्या वतीने हजारो विद्यार्थ्यांमार्फत महाराष्ट्रात राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आले. यामध्ये आतापर्यंत राज्यभरातील 22 विद्यापीठांमधून विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या अमृत कलशाचे एकत्रीकरण होणार आहे.

    कार्यक्रमासाठी माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल. तसेच 22 विद्यापीठांचे कुलगुरू आणि प्रतिनिधीही उपस्थित असतील.