अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले, राज्याचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैला होणार मुंबईत

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session 2022) आज शुक्रवारी शेवटचा दिवस होता. आज सूप वाजले आहे. तीन आठवड्याच्या ३ मार्चपासून सुरु झालेल्या या अधिवेशनात एकूण ८८ तास ३७ मिनिटे कामकाज झाले.

    मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session 2022) आज शुक्रवारी शेवटचा दिवस होता. आज सूप वाजले आहे. आता विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Session To Start From 18 July) हे आगामी १८ जुलै रोजी मुंबईत (Mumbai) होणार असल्याची घोषणा विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी केली.

    तीन आठवड्याच्या ३ मार्चपासून सुरु झालेल्या या अधिवेशनात एकूण ८८ तास ३७ मिनिटे कामकाज झाले. विरोधकांच्या गोंधळामुळे तसेच मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे ४ तास ३० मिनिटांचा वेळ वाया गेला. विधान परिषदेत एकूण २ विधयके मांडण्यात आली. तर दोन्ही विधेयक संमत करण्यात आली. तसेच विरोधक अनेक मुद्द्यांवर आक्रमक झाले.

    दरम्यान, आज शेवटपर्यंत विरोधक मलिक यांच्या राजीनाम्यावर ठाम होते, अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात विधान परिषदेत मंत्री उपस्थित नसल्यामुळे १० मिनिटे कामकाज बंद पडले. ३ मार्च ते २५ मार्च २०२२ या काळात विधान परिषदेच्या एकूण १५ बैठका झाल्या. त्यात प्रत्यक्षात ८८ तास ३७ मिनिटे कामकाज झाले. विविध कारणांमुळे ४ तास ३० मिनिटे वाया गेली. रोजचे सरासरी ५ तास ५३ मिनिटे कामकाज झाले. यात १७५५ तारांकित प्रश्न विचारण्यात आले होते. त्यापैकी ७७५ प्रश्न स्वीकारले. तर ११३ प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. नियम ९३ च्या ८० सूचना स्वीकारण्यात आल्या. १९ सूचनांवर मंत्र्यांनी निवेदने दिली. तर १९ निवेदने पटलावर ठेवण्यात आली. औचित्याचे १०६ मुद्दे प्राप्त झाले. त्यातील ७२ मुद्दे पटलावर ठेवले. या काळात ५८५ लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या असून त्यातील २१० सूचना मान्य करण्यात आल्या.

    आज शेवटच्या दिवसी अंतिम आठवडा प्रस्तावावर सत्ताधारी यांनी उत्तर दिली. मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना विरोधकांना धारेवर धरत जोरदार हल्लाबोल केला. आक्रमक व भावनिक भाषण मुख्यमंत्र्यांनी केले.