विधान परिषदेचं कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब

विधीमंडळाचं कामकाज सुरु झाल्यावर विरोधकांकडून २८९ अंतर्गत सर्व कामकाज बाजूला ठेऊन भंडारा जिल्ह्यातील बलात्कार प्रकरणावर चर्चेची मागणी करण्यात आली आहे. यावेळी विधानपरिषद (Maharashtra Legislative Council) १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली आहे.

    मुंबई: आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon Session) दुसरा दिवस आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. ‘५० खोके एकदम ओक्के’ची आज दुसऱ्या दिवशीही घोषणाबाजी करण्यात आली. विधीमंडळाचं कामकाज सुरु झाल्यावर विरोधकांकडून २८९ अंतर्गत सर्व कामकाज बाजूला ठेऊन गोंदिया बलात्कार प्रकरणावर चर्चेची मागणी करण्यात आली आहे. यावेळी विधानपरिषद (Maharashtra Legislative Council) १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली आहे.

    दरम्यान याआधी विधानसभेत मुंबई गोवा महामार्गावरुन गोंधळ, मुंबई-गोवा हायवेवर अडीच वर्षात काही काम झालं नाही का? असा प्रश्न भाजपनं सेनेच्या आमदारांना विचारला, त्यावर भास्कर जाधव यांनी गेल्या १२ वर्षात हे चंद्रकांतदादा, नितीन गडकरींचं अपयश आहे का असा प्रति सवाल केला.