
विधानसभा अध्यक्षांच्या (Maharashtra Assembly Winter Session) निवडीबाबत नियम समितीचा अंतरिम अहवाल आज विधानसभेत मांडण्यात आला.
मुंबई : विधानसभा अध्यक्षांच्या (Maharashtra Assembly Winter Session) निवडीबाबत नियम समितीचा अंतरिम अहवाल आज विधानसभेत मांडण्यात आला. (Assembly Speaker Selection Process) या बाबतच्या नियमातील दहा दिवसांच्या तरतूदी स्थगित करण्याबाबतच्या प्रस्तावाला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तीव्र आक्षेप घेतला. अशा प्रकारे चुकीचा पायंडा पाडू नये आणि गुप्त मतदानाची तरतूद बदलू नये असे ते म्हणाले .मात्र या विषयावर अधिवेशनाचा कालावधी कमी असल्याने तसेच गेले अनेक महिने कोरोनामुळे मोठ्या कालावधीचे अधिवेशन घेणे शक्य झाले नसल्याने अध्यक्षांचे पद रिक्त राहिले आहे, त्यामुळे या मुद्यावर प्रतिष्ठेचा प्रश्न न करता सामंजस्याने याच सत्रात विधानसभा अध्यक्षांची निवड होण्यासाठी सहकार्य करण्याचा आग्रह मंत्री नबाब मलिक यानी धरला.
आघाडीचे सरकार हे चुकीच्या पद्धतीने सत्तेवर
मात्र विधानसभा अध्यक्षांची निवड सरकारला करायची आहे की नाही असा सवाल महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधान सभेत उपस्थित केला. ते म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार हे चुकीच्या पद्धतीने सत्तेवर आले आहे. त्यामुळे ते चुकीच्या पद्धतीने मतदानाचा ते आग्रह ते करीत आहेत. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी सभागृहात आमदार घोडेबाजार करतात असा उल्लेख केल्याचा त्यांनी निषेध व्यक्त केला. नाना पटोले दहा वर्षे भाजपमध्ये राहिले त्यांनी पक्षातील चांगल्या संस्कारांचा सन्मान करावा असे ते म्हणाले.
आघाडी सरकारजवळ धैर्य नाही
सत्ताधारी विरोधी पक्षातील आमदारांसोबत बसूनही विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबद्दल तोडगा काढू शकतात. परंतु ते तसे करण्यापासून मुद्दाम स्वत:ला रोखत आहेत असेही ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारजवळ धैर्य नाही. आवाजी पद्धतीने मतदान घेण्याच्या मुद्द्यावर आक्षेप घेत गुप्त मतदान घेण्यात यावे असे ते म्हणाले. आवाजी पद्धतीने प्रभारी अध्यक्षांनी परवानगी देऊ नये, अशी आग्रही मागणीही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला. त्या नंतरही सत्ताधारी बाजूचा ठराव मतास टाकण्यात आला आणि आवाजी मतदानाने संमत करण्यात आला. त्याचा निषेध करताना देवेंद्र फडणवीस यानी सांगितले की, विरोधीपक्षांच्या वैधानिक हक्कांवर गदा आणणाऱ्या सरकारचा निषेध करत आम्ही सभात्याग करतो, त्यानंतर विरोधीसदस्यांनी सभागृहातून बहिर्गमन केले.