महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांची इंडिया आघाडीला कोपरखळी: म्हणाले…

आघाडीची मोट बांधणारे नितीश कुमार यांनीच भाजपाची साथ दिल्यामुळे आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. यावर आता सत्ताधारी भाजपाने विरोधकांवर टीकास्त्र डागलं आहे. महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी इंडिया आघाडीला कोपरखळी लगावली आहे.

    मुंबई : बिहारच्या राजकारणामध्ये (Bihar Politics) मोठा भूकंप झालेला आहे. बिहारच्या अनेकवेळा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले नितीश कुमार (Nitish Kumar resignation) यांनी महागठबंधनातून बाहेर पडत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बिहारसह इंडिया आघाडीवर (India Alliance) देखील परिणाम झालेला आहे. इंडिय़ा आघाडीची मोट बांधणारे नितीश कुमार यांनीच भाजपाची  (Nitish Kumar In BJP) साथ दिल्यामुळे आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. यावर आता सत्ताधारी भाजपाने विरोधकांवर टीकास्त्र डागलं आहे. महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhyay) यांनी इंडिया आघाडीला कोपरखळी लगावली आहे.

    सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केशव उपाध्ये यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी इंडिया आघाडीला धारेवर धरले. केशव उपाध्ये म्हणाले, “फुटलेल्या INDI आघाडीचे तुकडे तर झाले आहेत. बंगालमध्ये ममता बॅनर्जी वेगळ्या लढणार आहेत, तर पंजाबमध्ये आप. पंगतीत सोबत जेवणारे, जागा वाटपाच्या आणि मोदीजींना हरवण्याच्या गप्पा मारणारे, आज एकमेकांच्या समोर उभे आहेत. बंगालमध्ये राहुल गांधींच्या यात्रेला परवानगी नाही दिली…लोकांमध्ये जाण्यापूर्वीच विश्वास तोडणारे देश जिंकण्याच्या गप्पा मारताहेत”

    आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये नरेंद्र मोदी व भाजपसमोर कडे आव्हान उभे करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. या इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून नितीश कुमार यांच्या नावाची चर्चा होती. कारण इंडिया आघाडीची मोट बांधण्यामध्ये नितीश कुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता मात्र त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे इंडिया आघाडीतील अंतर्गत कलह समोर आला आहे. यामुळे भाजप विरोधकांवर जोरदार टीका करत आहे.