महाराष्ट्रात हुडहुडी!, पण विदर्भातील ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता, शेती पिकांवर होणार परिणाम; पावसाचे ‘हे’ आहे कारण?

विदर्भात वातावरणात अचानक बदल झाल्याने अकोला जिल्ह्यातील थंडी गायब झाली आहे. हवामानतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार अफगाणीस्थानवर चक्राकार वाऱ्याच्या स्वरूपात पश्चिमी विक्षोभ सक्रिय आहे. त्यामुळं राजस्थानवर १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

  नागपूर : शेतकऱ्यांसाठी एक गंभीर बातमी समोर येत आहे. अवकाळी पावसामुळं शेतीवर परिणाम होणार आहे. सध्या राज्यात थंडीचे (cold) प्रमाण वाढले आहे. निम्मापेक्षा अधिक महाराष्ट्र (Maharshtra) गारठला आहे. उत्तर (north) भारतातून एकापाठोपाठ आलेले दोन्ही पश्चिमी चक्रवात तसेच काश्मिरातील बर्फवृष्टी यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील किमान तापमानात (temperature) ४ ते ५ अंशांची घट झाली. यामुळं कमालीची थंडी वाढली असून, सर्वंत्र हुडहुडी वाढली आहे. तसेच आता मुंबईत (Mumbi) हुडहुडी वाढली आहे, त्यामुळं मुंबईकर गारठले आहेत. या थंडीचा आरोग्यावर देखील परिणाम होत असून, दमा, श्वसनाचे विकार व आजार असणाऱ्यांना या थंडीमुळं त्रास होतोय, असं आरोग्यतज्ज्ञांनी म्हटलं आहे. परंतू विदर्भात अस्मानी संकटाचा सामना करावा लागणार आहे.

  या जिल्ह्यात पाऊस?

  दरम्यान, विदर्भात वातावरणात अचानक बदल झाल्याने अकोला जिल्ह्यातील थंडी गायब झाली आहे. हवामानतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार अफगाणीस्थानवर चक्राकार वाऱ्याच्या स्वरूपात पश्चिमी विक्षोभ सक्रिय आहे. त्यामुळं राजस्थानवर १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. तसेच ईशान्य अरबी समुद्रापासून नैऋत्य उत्तर प्रदेशपर्यंत कमी दाबाची द्रोणिय स्थिती आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रात जाणवणार असून, विदर्भात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

  तुरळक पाऊस…

  विदर्भातील काही जिल्ह्यात तसेच अकोला जिल्ह्यात दोन दिवसांपासून सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, हवामान अभ्यासकांनी पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी साधारण पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या शक्यतेनुसार अकोला शहरासह परिसरात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला आहे. याचा परिणाम फळबाग पिकांवर तसेच शेती पिकांवर होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

  मुंबईत हुडहुडी…

  तर दुसरीकडे मागील काही दिवसांपासून राज्यासह मुंबईत थंडी वाढली आहे. मुंबईतील किमान तापमान १५ अंश किंवा त्याहून कमी असण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वाढत्या थंडीमुळे नागरिकांनी उबदार कपडे परिधान करणे पसंद केले आहे. अशातच आज मुंबईचे किमान तापमान सोमवारपेक्षाही कमी नोंदवले जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळं मुंबईकर सध्या गारठल्याच चित्र आहे.