शुक्रवारी महाराष्ट्र बंद!! त्र्यंबकेश्वरमध्ये घडलेल्या ’त्या’ घटनेचा करणार निषेध

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील हिंदूंच्या प्रसिद्ध मंदिरात धूप दाखवण्याच्या नावाने शिरकाव करण्याचा व मंदिरात चादर चढविण्याचा झालेला अयशस्वी प्रयत्न निंदनीयच आहे. हा प्रकार म्हणजे भविष्यातील धोक्याची घंटी आहे हे लक्षात घेऊन हिंदूंनी जागे व्हावे, यासाठी शुक्रवार (दि. १९) रोजी महाराष्ट्र बंद पाळण्यात येईल, असा इशारा लव्ह जिहाद संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष आणि कट्टर हिंदू नेते गजू घोडके यांनी दिला.

    सिडको : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील हिंदूंच्या प्रसिद्ध मंदिरात धूप दाखवण्याच्या नावाने शिरकाव करण्याचा व मंदिरात चादर चढविण्याचा झालेला अयशस्वी प्रयत्न निंदनीयच आहे. हा प्रकार म्हणजे भविष्यातील धोक्याची घंटी आहे हे लक्षात घेऊन हिंदूंनी जागे व्हावे, यासाठी शुक्रवार (दि. १९) रोजी महाराष्ट्र बंद पाळण्यात येईल, असा इशारा लव्ह जिहाद संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष आणि कट्टर हिंदू नेते गजू घोडके यांनी दिला.

    गेल्या काही दिवसांच्या घटना बघितल्या म्हणजे हिंदूंना डिवचण्याच्या, गरीब लोकांना हेरून धर्मांतर घडवून आणण्याचा आणि हिंदूंच्या मुलींना फूस लावून पळवून नेणे आणि त्यांच्यावर अत्याचार करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहेत. पोलिसांवर हात उचलण्यापर्यंत यांची मजल जाते याचाच अर्थ हे लोक किती निर्धावलेले आहेत आणि आम्ही काही केले तरी आमचे कुणीच काही वाकडे करू शकत नाही असा समाज करून घेण्यापर्यंत यांची मजल जातं असेल तर त्यांना हिसका दाखविण्यासाठी हिंदूंनी एकत्र येऊन आपली वज्रमूठ दाखविण्यासाठीच १९ ला महाराष्ट्र बंदची ही हाक असल्याचे घोडके यांनी पुढे म्हटले आहे.

    त्र्यंबकेश्वर येथील घटनेची प्रशासनाने दखल घेऊन काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी हे प्रकरण सौम्यपणे घेण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही तो मुळीच खपून घेणार नाही. त्र्यंबकेश्वर मंदिराला धूप दाखविण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रथा आहे असे मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांतर्फे सांगण्यात येत असले तरी मंदिराच्या एका विश्वस्ताने त्यांचा हा दावा खोडून काढला आहे. अशी कोणतीही प्रथा नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.त्यामुळे मंदिरात प्रवेश करण्याचा त्यांचा नेमका हेतू काय होता हे पोलिसांनी शोधून काढलेच पाहिजे. जाणून-बुजून केलेला हा प्रकार असून यामागे नेमक्या कोणत्या शक्ती आहेत हे पोलिस यंत्रणेने शोधून काढून त्या सर्वांवर मोक्का लावला पाहिजे.

    जेणेकरून पुढे असा प्रकार करण्याची कुणाची हिम्मतच होणार नाही. आज ते मंदिरापर्यंत आले. उद्या ते तुमच्या आमच्या घरापर्यंत पोहोचतील. त्यामुळे हिंदू बांधवांनी आत्ताच जागे झाले पाहिजे. सर्व हिंदूत्ववादी संघटनांनी त्र्यंबकेश्वर येथील घटनेचा तीव्र निषेध केला पाहिजे. मध्यंतरी नाशकात सकल हिंदू समाजाने जी एकजूट दाखवली होती तशीच एकजूट शुक्रवारी आयोजित महाराष्ट्र बंदच्या वेळी दाखवावी. राज्यातील सर्व साधूसंत आणि महंत तसेच हिंदूत्ववादी संघटनांनी यात सहभागी व्हावे,असे आवाहनही गजू घोडके यांनी केले आहे.