राज्यात गेल्या २४ तासांमध्ये झाला नाही एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू, १२९ नव्या रुग्णांची नोंद

राज्यात आज १२९ नव्या कोरोना रुग्णांची (Maharashtra Corona Update) नोंद झाली आहे. त्यातील १२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये राज्यातएकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही.

    मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra) कोरोना रुग्णांची (Corona Patients)संख्या कधी कमी होताना दिसते तर कधी ती वाढताना दिसते. (Corona Update)राज्यात आज १२९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील १२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये राज्यातएकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही.

    राज्यात आज शून्य कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली आहे, ही एक सकारात्मक बाब आहे. राज्याचा मृत्यूदर हा १.८७ टक्के इतका झाला आहे. तसेच राज्यात आतापर्यंत ७७,३१,५८८ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९८.१० टक्के इतके झाले आहे.

    राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येची संख्या ही १५२६ इतकी आहे. सर्वाधिक म्हणजे ८९६ सक्रिय रुग्ण हे मुंबईत असून त्या खालोखाल पुण्याचा क्रमांक लागतो. पुण्यामध्ये सध्या ३०७ इतके सक्रिय रुग्ण आहेत. तसेच राज्यात आतापर्यंत ८,०५,७२,८६७ प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत.