राज्यात दिवसभरात १७८२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

राज्यात आतापर्यंत ७९,०२,४८० रुग्णांनी कोरोनावर (Maharashtra Corona Update) मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०२ इतके झाले आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचे मृत्यू प्रमाण १.८३ टक्के इतके झाले आहे.

    मुंबई: राज्यात गेल्या २४ तासांमध्ये राज्यात १७८२ नव्या कोरोना रुग्णांची (Corona Patients) नोंद झाली आहे. तसेच सात कोरोनाबाधितांचा मृत्यू (Maharashtra Corona Update) झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांमध्ये राज्यात एकूण १८५४ रुग्णांनी कोरोनावर (Corona Patients In Maharashtra) मात केली आहे.

    राज्यात आज एकूण ११,८८९ इतके रुग्ण सक्रिय आहेत. सर्वाधिक सक्रीय रुग्णसंख्या ही मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये ३१२७ इतके सक्रिय रुग्ण असून त्यानंतर पुण्यामध्ये २६७२ सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंत ठाण्याचा नंबर लागतो. कारण ठाण्यात ११२० रुग्ण आहेत.

    राज्यात आतापर्यंत ७९,०२,४८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०२ इतके झाले आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचे मृत्यू प्रमाण १.८३ टक्के इतके झाले आहे.

    देशाबद्दल सांगायचं तर गेल्या २४ तासांत १२ हजार ७५१ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्याआधी रविवारी १८ हजार ७३८ रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. सोमवारी दिवसभरात देशात १६ हून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.