राज्यात दिवसभरात १८८६ कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू (Maharashtra Corona Update) झाला आहे. राज्यातील मृत्यूदर १.८३ टक्के इतका झाला आहे. आतापर्यंत राज्यामध्ये ७८,८९,४७८ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत.

    मुंबई : राज्यात आज १८८६ कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आज दिवसभरात २१०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या २४ तासांमध्ये नोंद झालेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील आणि पुण्यातील रुग्णांचे प्रमाण जास्त आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर १.८३ टक्के इतका झाला आहे. आतापर्यंत राज्यामध्ये ७८,८९,४७८ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८ टक्के इतकं झालं आहे. राज्यात एकूण १२५८३ सक्रीय रुग्ण आहेत. त्यामध्ये पुण्यात ३६६५ इतके रुग्ण आहेत. तसेच मुंबईमध्ये १९५५ सक्रिय रुग्ण आहेत.

    देशाबद्दल सांगायचं तर सोमवारी १३ हजार ७३४ नवीन कोरोनाबाधित आढळले. तसेच गेल्या २४ तासांत ३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.