राज्यात गेल्या २४ तासांमध्ये २०८ नव्या रुग्णांची नोंद, १३३ जण कोरोनामुक्त होऊन परतले घरी

राज्यात आज एकाही कोरोनाबाधिताचा (Maharashtra Corona Update) मृत्यू झाला नाही. राज्यातील मृत्यूदर हा १.८७ टक्के इतका आहे. तर राज्यात आतापर्यंत ७७,३३,१७६ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

    मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची (Corona) संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. आज राज्यामध्ये २०८ नवे कोरोनाबाधित (Corona Patients In Maharashtra) आढळले आहेत. (Maharashtra Corona Update) तसेच दिवसभरात एकूण १३३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

    राज्यात आज एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही. राज्यातील मृत्यूदर हा १.८७ टक्के इतका आहे. तर राज्यात आतापर्यंत ७७,३३,१७६ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९८.१० टक्के इतके झाले आहे.

    राज्यात आज १९७८ सक्रिय रुग्णांची नोंद आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे १३७० रुग्ण मुंबईमध्ये आढळतात. तर त्या खालोखाल पुण्यामध्ये २८४ इतके सक्रिय रुग्ण आहेत.

    देशातल्या कोरोना आकडेवारीबद्दल सांगायचं तर गेल्या २४ तासात देशात २ हजार २२२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर मागील २४ तासात कोरोनामुळे ४६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.