Corona in Nagpur has the highest number of post-50 patients in the list of dead

आज राज्यातील कोरोनाच्या आकडेवारीत (Maharashtra Corona Update) आज काहीशी घट झाल्याचं समोर आलं आहे. राज्यात आज दिवसभरात २३५४ नव्या रुग्णांची भर पडली आहे.

    मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची (Corona Patients) आकडेवारी वाढत होती. मात्र आज राज्यातील कोरोनाच्या आकडेवारीत (Maharashtra Corona Update) आज काहीशी घट झाल्याचं समोर आलं आहे. राज्यात आज दिवसभरात २३५४ नव्या रुग्णांची भर पडली आहे. कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारच्या आत आली आहे. आज दिवसभरात एकूण १४८५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील (Mumbai) आहे. मुंबईत आज १३१० रुग्णांची नोंद झाली आहे.

    राज्यात आज एकूण दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा १.८६ टक्के इतका झाला. आतापर्यंत राज्यामध्ये ७७,६५,६०२ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.८३ टक्के  (Corona Recovery Rate) इतकं झालं आहे. राज्यात आता एकूण २४,६१३ सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे १४०८९ इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये ५५२२ सक्रिय रुग्ण आहेत.