राज्यात दिवसभरात २६६ नव्या रुग्णांची नोंद, २४१ जण कोरोनामुक्त

राज्यात आज शून्य कोरोनाबाधित मृत्यूची नोंद (Maharashtra Corona Update) झाली आहे. राज्याचा मृत्यूदर(Death Rate) हा १.८७ टक्के इतका झाला आहे. तसेच राज्यात आतापर्यंत ७७,३१,८२९ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९८.१० टक्के इतके झाले आहे.

    मुंबई : राज्यात दिवसभरात २६६ नव्या कोरोना रुग्णांची (Corona) नोंद झाली आहे. तसेच २४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. (Maharashtra Corona Update) गेल्या २४ तासामध्ये राज्यात शून्य कोरोनाबाधितांचा मृत्यू (Corona Death)  झाला आहे.

    राज्यात आज शून्य कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर(Death Rate) हा १.८७ टक्के इतका झाला आहे. तसेच राज्यात आतापर्यंत ७७,३१,८२९ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९८.१० टक्के इतके झाले आहे.

    राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येची संख्या ही १५५१ इतकी आहे. सर्वाधिक म्हणजे ९३२ सक्रिय रुग्ण हे मुंबईत असून त्या खालोखाल पुण्याचा क्रमांक लागतोय. पुण्यामध्ये सध्या २९९ इतके सक्रिय रुग्ण आहेत. तसेच राज्यात आतापर्यंत ८,०५,९३,७२४ प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत.