राज्यात दिवसभरात आढळले ३९५७ नवे रुग्ण, ३६९६ जणांची कोरोनावर मात

राज्यात आज सात कोरोनाबाधितांचा मृत्यू (Maharashtra Corona Update) झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा १.८५ टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये ७७,९८,८१७ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत.

    मुंबई : राज्यामध्ये दिवसभरात आज ३९५७ नव्या कोरोना (Corona) रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आज दिवसभरात एकूण ३६९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. (Maharashtra Corona Update) आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक कोरोना रुग्ण हे मुंबईतील (Mumbai) आहेत. मुंबईत सध्या ११८४४ सक्रिय रुग्ण आहेत.

    राज्यात आज सात कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा १.८५ टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये ७७,९८,८१७ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.८२ टक्के इतकं झालं आहे.

    राज्यात आज एकूण २५,७३५ सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे ११,८४४ इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये ५६५५ सक्रिय रुग्ण आहेत. हळूहळू देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळं नागरिकांच्या चिंतेत वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत देशात १४ हजार ५०६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासात कोरोनामुळं देशात ३० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.