राज्यात दिवसभरात ६१९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

आज ६१९ कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. (Maharashtra Corona Update) तसेच ६८६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन आहेत.

    मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची (Corona Update) आकडेवारी कमी होताना दिसत आहे. कोरोनाचा आलेख उतरणीला लागला आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१३ टक्क्यांवर आले आहे. तर राज्यात आजही नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज ६१९ कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच ६८६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. (Maharashtra Corona Update)

    राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ६१९ कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण ६८६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात तीन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा १.८२ टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये ७९,६६,७६८ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८.१३ टक्के इतकं झालं आहे. राज्यात एकूण ३,७०९सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे ७५२ इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये ४५७ सक्रिय रुग्ण आहेत.

    देशात गेल्या २४ तासांत ४९१२ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. शनिवारी ही संख्या पाच हजारच्या घरात होती. आदल्या दिवशी देशात ५३८३ कोरोना रुग्ण आढळले होते. त्यामुळे आज तुलनेनं ४४१ रुग्ण घटले आहेत.