सीमावादावर महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमक, आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार

आज महाराष्ट्र एकीकरण समितीकडून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सकाळपासून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद (Maharashtra-Karnataka Border Dispute) पेटलेला असतानाच आता महाराष्ट्र एकीकरण समिती कोल्हापुरात धरणे आंदोलन करणार आहे.

    कोल्हापूर –  या महिन्याच्या सुरुवातीलच महाराष्ट्र कर्नाटक वाद पुन्हा उफाळून आला आहे. बेळगावमध्ये कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील गाड्यांवर हल्ला केला. यानंतर राज्यातील वातावरण पेटले असून, कर्नाटकच्य़ा मुख्यमंत्र्यांनी सांगलीतील काही गावांवर दावा केला आहे. तसेच एक इंचही जागा महाराष्ट्राला देणार नाही, असा ठराव विधानसभेत केला आहे. यानंतर महाराष्ट्रातील नेते व मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये, अशी धमकी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी दिली होती. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पेटले असून, सीमावादावर शिंदे-फडणवीस सरकार काहीही भूमिका घेत नसल्याची टिका होत आहे.

    दरम्यान, आज महाराष्ट्र एकीकरण समितीकडून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सकाळपासून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद (Maharashtra-Karnataka Border Dispute) पेटलेला असतानाच आता महाराष्ट्र एकीकरण समिती कोल्हापुरात धरणे आंदोलन करणार आहे. महाराष्ट्र सरकारने एक दिवस बंद करावा, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत मत महाराष्ट्र एकीकरण समितीची 21 डिसेंबर रोजी मराठा मंदिर येथे बैठक पार पडली. या बैठकीत सगळ्यांची मते जाणून घेऊन कोल्हापूरला जाऊन धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

    यानंतर आज आंदोलन करणयात येत आहे. बेळगावात आंदोलन केले तर कर्नाटकचे पोलीस आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणार, यासाठी कार्यकर्त्यांनी कोल्हापूरला जाऊन आंदोलन करावे असा निर्णय समितीने घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने देखील एक दिवस महाराष्ट्र बंद करुन आपण सीमावासियांच्या पाठिशी आहोत असे कर्नाटक सरकार आणि कन्नड संघटनांना दाखवून द्यावं असंही समितीने म्हटलं आहे. दरम्यान, या आंदोलनानंतर पंतप्रधान, गृहमंत्री यांच्या नावे कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाबाबत निवेदन देण्यात येणार आहे.