ग्रामपंचायत निवडणुक : सर्वाधिक जागांवर भाजप, शिंदे गट चौथ्या स्थानी

राज्यातील एकूण ६०८ पैकी ६१ जागा या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. २५९ हून अधिक ठिकाणी भाजपने विजय मिळवल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. तर, जवळपास ४० ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच निवडून आल्याचे बावनकुळे यांनी सांगितले आहे.

    मुंबई – राज्यातील ६०८ पैकी ५४७ ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. निकालात भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने जागा जिंकल्या आहेत.

    राज्यातील एकूण ६०८ पैकी ६१ जागा या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. २५९ हून अधिक ठिकाणी भाजपने विजय मिळवल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. तर, जवळपास ४० ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच निवडून आल्याचे बावनकुळे यांनी सांगितले आहे.

    ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसची पीछेहाट झाल्याचे दिसून येत आहे. प्रथमच निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या शिंदे गटाने काही ठिकाणी लक्षवेधी विजय मिळवला आहे. निकालामध्ये शिंदे गट चौथ्या क्रमांकावर आहे. तसेच, शिवसेनेलाही ग्रामीण भागात तुलनेने चांगले यश मिळाल्याचे दिसत आहे.