एफडीआयमध्ये महाराष्ट्र पुन्हा पहिला, मागील वर्षात किती कोटींची गुंतवणूक? देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेला आकडा किती?

तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा महाराष्ट्रात आलेला एफडीआय अधिक आहे. डीपीआयआयटीने एप्रिल ते जून 2023 या कालावधीसाठीच्या जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 36,634 कोटी रुपये विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे.

    मुंबई : महाराष्ट्र राज्यासाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे. 2022-23 या आर्थिक वर्षांत ₹1,18,422 कोटींची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आकर्षित करुन पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र 2023-24 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत सुद्धा पहिल्याच क्रमांकावर आहे. डीपीआयआयटीने एप्रिल ते जून 2023 या कालावधीसाठीच्या जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ₹36,634 कोटी रुपये विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन दिली आहे. (Maharashtra is again first in FDI, how many crores were invested in the last year? What is the number said by Devendra Fadnavis)

    महाराष्ट्रात 36 हजार 634 कोटींची परदेशी गुंतवणूक

    चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देखील सर्वाधिक एफडीआय अर्थात प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. एप्रिल ते जून 2023 या कालावधीत महाराष्ट्रात 36 हजार 634 कोटींची परदेशी गुंतवणूक आली. दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा महाराष्ट्रात आलेला एफडीआय अधिक आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यातील भक्कम सरकारची यशस्वी घौडदौड सुरु आहे आणि गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे मनापासून अभिनंदन! असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

    महाराष्ट्र अव्वल…

    2022-23 या आर्थिक वर्षांत 1,18,422 कोटींची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आकर्षित करुन पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र 2023-24 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत सुद्धा पहिल्याच क्रमांकावर आहे. महत्त्वाचं म्हणजे दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा महाराष्ट्रात आलेला एफडीआय अधिक आहे. डीपीआयआयटीने एप्रिल ते जून 2023 या कालावधीसाठीच्या जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 36,634 कोटी रुपये विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे.