ओमायक्रॉनमुळे राज्यात नवे निर्बंध, विधानभवनात दोन शिफ्टमध्ये चालणार काम – ‘अशी’ असेल वेळ

राज्य सरकारने सर्वत्र गर्दी टाळून कामकाज करण्याबाबत नवे निर्बंध लागू (New Restrictions In Maharashtra) केले आहेत. त्याचाच भाग म्हणून सध्या सरकारी कार्यालयातही ५० टक्के (50 Percent Attendance) उपस्थितीच्या निकषासह कामकाज केले जात आहे.

    मुंबई: राज्यात ओमायक्रॉन (Omicron) या रूपांतरीत कोविड विषाणुच्या संसर्गाने थैमान घातले आहे. त्यामुळे राज्य सरकारने सर्वत्र गर्दी टाळून कामकाज करण्याबाबत नवे निर्बंध लागू (New Restrictions In Maharashtra) केले आहेत. त्याचाच भाग म्हणून सध्या सरकारी कार्यालयातही ५० टक्के (50 Percent Attendance) उपस्थितीच्या निकषासह कामकाज केले जात आहे.

    राज्य विधिमंडळामध्येही याच कारणाने दोन सत्रामध्ये कर्मचारी आणि अधिकारी यांची विभागणी करण्यात आली असून गर्दी टाळण्यासाठी सकाळी ९ ते ३ आणि दापरी १ ते सायं ७ अशा दोन सत्रात विधिमंडळाचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. या काळात कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.