
राज्यात आज महत्त्वाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश देण्यात आले. राज्यातील अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये नक्कीच काहींना मनाप्रमाणे स्थान मिळाले आहे तर काहींना मनाविरुद्ध दुसऱ्या ठिकाणी जावे लागले आहे. पाहा कोणाला कुठे मिळाले पोस्टींग....
मुंबई : राज्यातील अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बंदलांचे आदेश देण्यात आले आहेत. असे असताना, पुन्हा एकदा वरिष्ठ पोलीस महानिरीक्षपदी अशोक मोराळे यांची नागपूरवरून पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात बदली करण्यात आली आहे. अशोक मोराळे यांना पुणे शहराची चांगली माहिती आहे. तसेच, त्यांनी या शहरात चांगले काम केले आहे. यापूर्वी त्यांनी शहरात काम केल्यामुळे शहराचा त्यांना चांगला अभ्यास आहे.
1. महेंद्र कमलाकर पंडित पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांची मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.
2. शैलेश बलकवडे पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांची पुणे येथे बदली करण्यात आली आहे.
3. योगेश कुमार गुप्ता पोलीस उपायुक्त मुंबई यांची नांदेड येथे बदली करण्यात आली आहे.
4. मोनिका राऊत अप्पर पोलीस अधीक्षक अकोला यांची नाशिक शहर पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
5. अभय डोंगरे प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र अकोला यांची जालना येथे बदली करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे इतर बदल्या ही पहा…..
विशेष पोलीस महानिरीक्षक अशोक मोराळे रा. रा. पोलीस बल, नागपूर यांची पुणे येथे बदली करण्यात आली आहे.
- अक्षय शिंदे पोलीस अधिक्षक जालना यांची नागपूर येथे बदली करण्यात आली आहे.
- जयंत मीना यांची पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण नांदेड यांची पुणे दहशतवादी विरोधी पथक येथे बदली करण्यात आली आहे.
- तुषार दोषी यांची पोलीस अधीक्षक दहशतवादी पथक, पुणे यांची जालना येथे बदली करण्यात आली आहे.