उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांकडे राजीनामा केला सुपूर्द; शिवसेना नेतेही यावेळी उपस्थित

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांचा राजीनामा स्वीकारला असून त्यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदाचा कार्यभार सांभाळण्यास सांगितले आहे.

    मुंबई : महाराष्ट्रात गेल्या ९ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर (Maharashtra Political Crisis) आज अखेर पडदा पडला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने बंडखोरी केल्याने आज अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray Resigns) सत्तेतून पायउतार झाले आणि (बुधवारी२९ जून) रात्री उशीरा त्यांनी आपला राजीनामा (Resigns) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari)  यांच्याकडे सुपूर्द केला आहे. यावेळी शिवसेनेतील अनेक नेतेमंडळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपस्थित होते.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन (Raj Bhavan) येथे भेट घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांचा राजीनामा स्वीकारला असून त्यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदाचा कार्यभार सांभाळण्यास सांगितले आहे.