आधी लगीन कोंढाण्याचे… मग… साखरपुडा उरकून आमदार मुंबईला

उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी एकेक आमदाराचे मत महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे देवेंद्र भुयार हे साखरपुडा उरकून लगेचच विधानभवनात होणाऱ्या फ्लोअर टेस्टसाठी मुंबईला रवाना होणार आहेत.

    मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार (MVA Government, Maharashtra) रहाणार की जाणार याचा फैसला अवघ्या काही तासांनी होणार आहे. उद्या होणाऱ्या फ्लोअर टेस्टला उपस्थित (Present For Floor Test) राहण्याच्या सूचना सर्वच आमदारांना (All MLA) देण्यात आल्या आहेत. यासाठी सगळेच आमदार मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत (All Mla’s come to Mumbai).

    मात्र, एक आमदार (MLA) आपला साखरपुडा उरकून लगेचच आपले कर्तव्य पाडण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. एकीकडे सत्ता समीकरणे (Maharashtra Political Crisis) तर दुसरीकडे भावी आयुष्याचा जोडीदार (Future Life Partner)  असा संघर्ष अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी मतदारसंघाचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar, Independent MLA of Warud Morshi constituency in Amravati district) यांच्या वाट्याला आला आहे.

    देवेंद्र भुयार हे शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते. राजू शेट्टी यांचे एकनिष्ठ म्हणून त्यांची ओळख होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भुयार यांनी तत्कालीन कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवून ती जिंकलीही. अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून देवेंद्र भुयार ओळखले जातात. राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र भुयार यांनी क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर आमदार देवेंद्र भुयार हे खऱ्या अर्थाने चर्चेत आले होते.

    उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी एकेक आमदाराचे मत महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे देवेंद्र भुयार हे साखरपुडा उरकून लगेचच विधानभवनात होणाऱ्या फ्लोअर टेस्टसाठी मुंबईला रवाना होणार आहेत.