राष्ट्रवादी समर्थक आमदार श्यामसुंदर शिंदे भाजपच्या गोटात?

राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे (Independent MLA Shyamsunder Shinde supporting NCP) यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली (Leader of Opposition Devendra Fadnavis met at Sagar Bungalow).

    मुंबई : महाविकास आघाडी सरकारला (MVA Government) उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध (Floor Test Tomorrow In Assembly) करावे लागणार आहे. त्यामुळे एक एक मत महत्वाचे असून मतांची बेगमी करण्यात सर्वच पक्ष जुंपले आहेत.

    अशातच राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे (Independent MLA Shyamsunder Shinde supporting NCP) यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली (Leader of Opposition Devendra Fadnavis met at Sagar Bungalow). यामुळे उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीदरम्यान (Floor Test) आमदार शिंदे यांचा कौल कुणाला मिळणार याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

    नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार मतदारसंघाचे शेकाप आमदार श्यामसुंदर शिंदे (Peasants and Workers Party of India MLA Shyamsunder Shinde of Loha Kandhar constituency in Nanded district) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आपला पाठिंबा दिला होता (Support To NCP). मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर अनेक आमदार हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. तर, काही अपक्ष आमदार भाजपसोबत जात आहेत. त्यात आता श्यामसुंदर शिंदे यांच्या नावाची भर पडत आहे.

    आमदार शिंदे यांनी सागर बंगल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सुमारे दीड तास त्यांची बैठक सुरु होती. त्यामुळे उद्या आमदार श्यामसुंदर शिंदे हे भाजपला समर्थन देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, उद्याच्या बहुमत चाचणीत आणखी दोन आमदार शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता आहे.