शिंदे गटाची संजय राऊतांवर सडकून टीका, संजय राऊत महामूर्ख, गाढवावर बसवून फिरवायला पाहिजे

जी व्यक्ती महिलेला धमकी देते, तिला महिला आरक्षण विधेयक कसं कळणार? जे संजय राऊत एका डॉक्टर महिलेला धमकी देतात, त्यांना महिला विधेयक कधीच मोठं वाटणार नाही.

    आमदार नरेंद्र भोंडेकर : शिवसेनेच्या बंडानंतर आरोप प्रत्यारोपाचा खेळ काही बंद होत नाही. नुकतीच भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे. त्याचबरोबर भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना शक्ती कपूर म्हणून संबोधलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देतना नरेंद्र भोंडेकर यांनी संजय राऊतांचा खरपूस समाचार घेतला आहे. माध्यमांशी बोलताना नरेंद्र भोंडेकर म्हणले, शक्ती कपूरपेक्षाही मोठी उपाधी द्यायची असली तर द्यायला पाहिजे, इतके मोठे महामूर्ख संजय राऊत आहेत. यांना शोभत नाहीत, महिला आरक्षण विधेयकावर संजय राऊतांनी दिलेली प्रतिक्रिया म्हणजे महिलांचा अपमान आहे. ज्यापद्धतीनं संजय राऊतांनी वक्तव्य केलं आहे, त्यानं समाजातील महिलांचा अपमान झाला आहे असे नरेंद्र भोंडेकर म्हणाले.

    पुढे नरेंद्र भोंडेकर म्हणाले, एकीकडे ४५४ मतांनी लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले आहेत. यामध्ये सर्वपक्षीय खासदारांनी मतदान केलं. त्यामध्ये शिवसेनेचेही खासदार आहेत, ज्यांनी महिला आरक्षण विधेयकाला समर्थन दिलं. त्यामध्ये संजय राऊत एकटेच विरोध करतात म्हणजे यानं मूर्खाचाही कळस गाठला आहे. त्यामुळे यांना गाढवावर बसून फिरवायला पाहिजे असे माझे मत आहे असे नरेंद्र भोंडेकर म्हणाले.

    काय म्हणालेले नितेश राणे?
    भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, “महिला आरक्षण विधेयकावर बोलताना संजय राऊत यांनी त्यात नवीन काय? असं वक्तल्य केलं होतं. जे संजय राऊत स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात शक्ती कपूरसारखा वागतो. जी व्यक्ती महिलेला धमकी देते, तिला महिला आरक्षण विधेयक कसं कळणार? जे संजय राऊत एका डॉक्टर महिलेला धमकी देतात, त्यांना महिला विधेयक कधीच मोठं वाटणार नाही. जेव्हा हे विधेयक संसदेत येईल, तेव्हा या संजय राऊत आणि त्याच्या मालकाच्या मुलासारखे शक्ती कपूर यांना जेलमध्ये जावं लागेल. संजय राऊत यांना संसद भवन बँकव्हेट हॉलसारख वाटतो. सर्व खासदारांना म्हणतो जुन्या संसद भवनमध्ये जावस वाटतंय. संजय राऊतची हीच भावना होती की, ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्री १ मध्ये आयुष्य काढलं, ती मातोश्री सोडून मातोश्री २ बांधण्याची काय गरज होती? तुम्ही आणि तुमच्यासारख्या शिवसैनिकांना मातोश्री २ मध्ये यायची परवानगी तरी आहे का? असे प्रश्न उपस्थित केले आहेत.”