खरा प्रतोद कोणता? आकडा कसा जमवला, कोणाला जबरीने आणले? विधानसभेतच होणार खरी परीक्षा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले ते अक्षरशः खरे आहे, “संसदीय लोकशाहीत आकड्याला आणि डोक्यांनाच महत्व आहे. तो आकडा कसा जमवला, कोणाला जबरीने आणले काय, याला महत्व नाही,” असे ते फेसबुकलाईव्हमध्ये म्हणाले होते. विधिमंडळ पक्षाचा नेता व विधिमंडळ पक्षाचा प्रतोद ही दोन अत्यंत महत्वाची पदे असून त्यावर कोणी विराजमान व्हायचे हे संख्येवरच ठरणार आहे(Maharashtra Politics).

    मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले ते अक्षरशः खरे आहे, “संसदीय लोकशाहीत आकड्याला आणि डोक्यांनाच महत्व आहे. तो आकडा कसा जमवला, कोणाला जबरीने आणले काय, याला महत्व नाही,” असे ते फेसबुकलाईव्हमध्ये म्हणाले होते. विधिमंडळ पक्षाचा नेता व विधिमंडळ पक्षाचा प्रतोद ही दोन अत्यंत महत्वाची पदे असून त्यावर कोणी विराजमान व्हायचे हे संख्येवरच ठरणार आहे(Maharashtra Politics).

    असे दिसते आहे की गुवाहाटीत बसलेल्या शिंदे गटाकडे शिवसेनेचे दोन तृतियांशपेक्षा अधिकचे आमदार जमा झाले आहेत. ताजा आकडा 41 आहे. काल त्यांनी विधिमंडळ सचिवालयाला जे पत्र पाठवले त्यावर 34 आमदारांच्या सह्या होत्या, पण त्यांची संख्या आणखी वाढली आहे. ठाकरेंसोबत सध्या फक्त तेरा आमदार उरले असावेत, त्यामुळे त्यांनी नियुक्त केलेल्या प्रतोदाचा अधिकार समाप्त झाल्याचे तज्ज्ञांचे सांगणे आहे.

    संसदीय कायद्यांचे तज्ज्ञ डॉ उल्हास बापट म्हणतात, शिवसेनेच्या एकूण विधानसभेतील आमदाराच्या दोन तृतियांश आमदार शिंदेंसबोत असतील तर त्यांच्या आमदारक्या जाण्याचा प्रश्न येत नाही. ते गट स्थापन करून वा स्वतःच शिवसेना मुख्य गट जाहीर करून राज्यपालांकडे पाठिंबा काढल्याचे पत्र पाठवू शकतील व त्यानंतर ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यास राज्यपाल सांगू शकतील. जी काही परीक्षा व्हायची ती विधानसभेतच होईल.