
हवामान विभागाकडून (Meteorological Department ) २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान राज्यात पावसाचा (Rain) अंदाज देण्यात आला आहे. राज्यातील मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई : सध्या राज्यात थंडीचे (cold) प्रमाण वाढले आहे. निम्मा महाराष्ट्र (Maharshtra) गारठला आहे. उत्तर (north) भारतातून एकापाठोपाठ आलेले दोन्ही पश्चिमी चक्रवात तसेच काश्मिरातील बर्फवृष्टी यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील किमान तापमानात (temperature) ४ ते ५ अंशांची घट झाली. यामुळं कमालीची थंडी वाढली असून, सर्वंत्र हुडहुडी वाढली आहे. त्यामुळं या थंडीचा आरोग्यावर देखील परिणाम होत असून, दमा, श्वसनाचे विकार व आजार असणाऱ्यांना या थंडीमुळं त्रास होतोय, असं आरोग्यतज्ज्ञांनी म्हटलं आहे. प्रचंड थंडीमुळं गारठलेले नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत.
दरम्यान, राज्यात आगामी काळात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसाचा फटका शेती पिकांवर होणार आहे. हवामान विभागाकडून (Meteorological Department ) २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान राज्यात पावसाचा (Rain) अंदाज देण्यात आला आहे. राज्यातील मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबतची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर (Krishnanand Hosalikar) यांनी ट्वीट करुन दिली आहे.
Rainfall Forecast for 4 weeks:
WD associated precipitation over N India &adj region central India expected in wk 1 & 2.
RF activity will cont ovr BoB & adj S Peninsula in wk 2 & 3.
📢 27Jan – 2Feb राज्यात #मराठवाडा,#विदर्भ व परीसरात हलका-मध्यम पावसाची शक्यता, ढगाळ वातावरण.– IMD pic.twitter.com/wQAIqhRhKp
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 21, 2023
देशासह राज्यात मागील काही महिन्यांपासून हवामानात सातत्यानं बदल (Climate Change) होताहेत. कुठे थंडीचा कडाका (Cold Wave) तर कुठं ढगाळ वातावरण आहे. तर कुठं हलक्या पावसाच्या सरी.. या हवामानातील चढ-उतार व बदलामुळं नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम व त्रास होतोय. तसेच प्रामुख्याने याचा शेती पिकांवर (Agriculture Crop) देखील परिणाम होताना दिसत आहे. आता २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान राज्यात पावसाचा (Rain) अंदाज देण्यात आला आहे. याचे नुकसान फळबाग तसेच शेती पिकांवर होणार असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.