संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

महाराष्ट्रातील रस्ते शेजारील गुजरातपेक्षा चांगले असल्याचे उच्च न्यायालयाने (High Court) स्पष्ट केले. तसेच महाराष्ट्र हे गुजरातपेक्षा सर्वार्थाने अग्रेसर असल्याचेही खंडपीठाने याचिकाकर्त्यांना सुनावले.

    मुंबई : महाराष्ट्रातील रस्ते शेजारील गुजरातपेक्षा चांगले असल्याचे उच्च न्यायालयाने (High Court) स्पष्ट केले. तसेच महाराष्ट्र हे गुजरातपेक्षा सर्वार्थाने अग्रेसर असल्याचेही खंडपीठाने याचिकाकर्त्यांना सुनावले.

    नाशिक मुंबई महामार्गावर खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरावस्था झाल्याचा दावा करणारी जनहित याचिका ऍड. मंजुळा बिस्वास यांनी केली आहे. महामार्गाच्या दुर्दशेबाबतचे काही फोटो याचिकाकर्त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येणारी सामग्री निकृष्ट दर्जाची असल्याचेही न्यायालयाला सांगितले. अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था बिकट असून, शेजारील गुजरातमध्ये रस्ते उत्तम दर्जाचे आहे. मग आपल्याकडे असे रस्ते का नाहीत? अशी विचारणाही याचिकाकर्त्यांनी केली. त्यावर मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने उपरोक्त टिपण्णी केली.

    याचिकेनुसार, नाशिक-मुंबई (एनएच १६०) महामार्गावरून खड्यांमुळे प्रवास करणे जीव घेणे व झाल्याचा दावा याचिकेत केला आहे. हा महामार्ग नाशिक शहरासह घोटी, इगतपुरी ते कसारा, शहापूर असा मुंबईला येऊन मिळतो. या महामार्गावर हे खड्डे भरण्यासाठी व देखरेख ठेवण्यासाठी प्रती वाहन १२० रुपये टोल वसूल करूनही रस्त्याच्या दुर्दशा झाली.