मोठी बातमी – महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

दहावीची परीक्षा (10Th Exam Result) दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड एज्युकेशन (MSBSHSE) मार्फत उद्या दहावीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत.

  दहावीच्या निकालाची (SSC Result 2022) प्रतीक्षा पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. उद्या १७ जून रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. अशातच आता दहावीची परीक्षा (10Th Exam Result) दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड एज्युकेशन (MSBSHSE) मार्फत उद्या दहावीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. MSBSHSE च्या वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे.

  दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी तर ७ लाख ४९ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामुळे दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालक डोळे लावून बसले होते. मंडळाकडून २० जूनपर्यंत निकाल जाहीर होईल असे सांगण्यात आले होते आणि त्यानुसार उद्या म्हणजे १७ जून रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होईल.


  दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. यामध्ये सुमारे १,४४९,६६० विद्यार्थी सहभागी झाले होते. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी तर ७ लाख ४९ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामुळे दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालक डोळे लावून बसले आहेत. गेल्या महिन्यात राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र दहावीचा निकाल २० जूनपर्यंत जाहीर केला जाईल, असं सांगितलं होतं.

  असा पहा १० वीचा निकाल

  • SSC Examination March – 2022 RESULT लिंकवर क्लिक करा.
  • आता Roll Number आणि Mother’s First Name भरा.
  • त्यानंतर View Result वर क्लिक करा.
  • तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल, याची प्रत (Print Out) घ्यायला विसरू नका.

  येथे पहा निकाल :

  www.mahresult.nic.in
  http://sscresult.mkcl.org
  https://ssc.mahresults.org.in