सीमावासीय मराठी बांधवांच्या मागे महाराष्ट्र उभा; हिवाळी अधिवेशनात येणार सर्वपक्षीय ठराव, नागपूरचे हिवाळी अधिवेशन दोन आठवडे चालणार

मराठवाडा मुक्ती संग्रामाचे यंदा अमृतमहोत्सवी वर्ष असून यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. त्याची रूपरेषा या अधिवेशनात ठरविण्यात येणार आहे. या अधिवेशनात मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली सहा आणि मंत्रिमंडळाची मान्यता अपेक्षित असलेली १५ अशी एकूण २१ विधेयके मांडण्यात येणार आहेत.

  मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क

  नागपूरचे हिवाळी अधिवेशन (Nagpur Winter Session) दोन आठवड्यांचे (Two Weeks) घेण्याचाही निर्णय आज झालेल्या विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. १९ डिसेंबरपासून सुरु होणारे हे अधिवेशन ३० डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

  हे अधिवेशन किमान तीन आठवडे (At Least Three Weeks) घेण्यात यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित (Leader Of Opposition Ajit Pawar) पवार यांनी या बैठकीदरम्यान केली. विरोधी पक्षनेत्यांची ही मागणी विचारात घेऊन अधिवेशन काळात नागपूर येथे २८ डिसेंबरला बैठक घेऊन यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narvekar), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी मान्य केले.

  विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक आज विधानभवनात संपन्न झाली. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष डॉ. राहूल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.

  हिवाळी अधिवेशनाची सुरुवात शोक प्रस्तावाने होणार असून या अधिवेशनात महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मराठी बांधवाच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे हे दाखविण्यासाठी सर्वपक्षीय ठराव मांडण्यात येणार आहे. तर, विदर्भातील प्रश्नांना अधिकाधिक न्याय देण्यासाठी तसेच विधिमंडळ सदस्यांना सभागृहाच्या कामकाजात अधिकाधिक सहभाग घेता यावा यासाठी सभागृहाचे कामकाज सकाळी विशेष बैठक घेण्यात येणार आहे.

  मराठवाडा मुक्ती संग्रामाचे यंदा अमृतमहोत्सवी वर्ष असून यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. त्याची रूपरेषा या अधिवेशनात ठरविण्यात येणार आहे. या अधिवेशनात मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली सहा आणि मंत्रिमंडळाची मान्यता अपेक्षित असलेली १५ अशी एकूण २१ विधेयके मांडण्यात येणार आहेत. साधारण दर दिवशी तीन विधेयके मांडण्यात येतील अशी माहिती विधान भवनातील सूत्रांनी दिली.

  अधिवेशन तीन आठवडे घ्या – अजित पवार

  कोरोनामुळे दोन वर्षे नागपूरला हिवाळी अधिवेशन होऊ शकले नाही. त्यामुळे नागपूर, विदर्भाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, विदर्भवासियांमधील दुर्लक्षाची भावना दूर करण्यासाठी नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्यात यावे. मराठवाडा मुक्तीचा संघर्ष नव्या पिढीपर्यंत घेऊन जावा. विधीमंडळ सदस्यांना सभागृहाच्या कामकाजात अधिकाधिक भाग घेता यावा यासाठी सभागृहाचे कामकाज सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरु व्हावे अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या बैठकीत केली.