maharashtra tableau 2022

दरवर्षीप्रमाणे यंदाही राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2022) संचलनाचा कार्यक्रम (Republic Day Parade) आयोजित करण्यात आला.या संचलनात जवळपास १२ राज्यांचे आणि ९ मंत्रालयांचे असे २१ चित्ररथ सहभागी झाले आहेत. यंदा या सोहळ्यातील महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ (Maharashtra Tableau) खूप खास आहे.

    आज संपूर्ण देशभरात ७३ वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2022) साजरा केला जात आहे. भारताचं स्वातंत्र्याचं ७५ वे वर्ष असल्याने हा प्रजासत्ताक दिन विशेष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचा कार्यक्रम (Republic Day Parade) आयोजित करण्यात आला.या संचलनात जवळपास १२ राज्यांचे आणि ९ मंत्रालयांचे असे २१ चित्ररथ सहभागी झाले आहेत. यंदा या सोहळ्यातील महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ (Maharashtra Tableau) खूप खास आहे. या चित्ररथाला प्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांनी आवाज दिला आहे.या चित्ररथाची संकल्पना सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहसंचालक मीनल जोगळेकर (Meenal Joglekar) यांची आहे.

    यंदाच्या संचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ महाराष्ट्राने तयार केला आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथात साताऱ्यातील ‘कास’ पठार दाखवण्यात आले आहे. या चित्ररथावर सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील फुले व प्राण्यांच्या प्रजातीचा समावेश करण्यात आला. कास पठाराचा चित्ररथात समावेश झाल्याने सातार्‍यासाठी ही बाब भूषणावह ठरली आहे.

    महाराष्ट्राच्या चित्ररथावर पाच “जैवविविधता मानकं” आहेत. ज्यात राज्यासाठी अद्वितीय असलेल्या वनस्पती आणि प्राणी यांचा समावेश आहे. सुमारे १५ प्राणी आणि २२ वनस्पती आणि फुले या चित्ररथावर प्रदर्शित करण्यात आली. या चित्ररथासाठी एक विशेष गाणेही तयार करण्यात आले होते. या गाण्याद्वारे झाडे लावा, झाडे जगवा हा विशेष संदेश देण्यात आला आहे.

    “वनराईचा राजा आंबा, ताम्हण आणि मस्त शेकरु
    हरियालाचे रुप देखणे, निळे-जांभळे फुलपाखरु
    अथांग सागर रम्य किनारे, सह्याद्रीचे उंच कडे
    गवत फुलांच्या रंगावरती महाराष्ट्राचा जीव जडे
    जपतो आम्ही जैववारसा, जपतो आम्ही वसुंधरा
    झाडे लावू, झाडे जगवू हाच आमुचा धर्म खरा”.

    हे गाणं महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी तयार करण्यात आलं आहे.