
पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे. राज्यामध्ये तलाठी भरती परीक्षेच्या तिसऱ्या सत्राची परीक्षा सुरु आहे.
तलाठी परीक्षेचा घोटाळा : राज्यामध्ये याआधी नाशिकमध्ये तलाठी परीक्षेमध्ये पेपर फुटीची घटना समोर आली होती. त्यावेळी या प्रकरणामध्ये गणेश गुसिंगे या व्यक्तीला अटक करण्यात आली होती. या उमेदवारावर पिंपरी चिंचवड पोलिस भरती प्रक्रियेमध्ये आणि म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज्यामध्ये पुन्हा तलाठी भरतीची परीक्षा सुरु आहे आणि या प्रकरणी अनेक घोटाळे पुढे येत आहे. या परीक्षेच्या दरम्यान अमरावतीमध्ये हायटेक कॉपी करण्याची घटना पुढे आली असून एका उमेदवाराला अटक करण्यात आली आहे.
राज्यामध्ये तलाठी भरती परीक्षेचे घोटाळे संपत नाहीयेत. या परीक्षेच्या सत्रामध्ये अमरावती येथे हायटके कॉपीचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी एका उमेदवाराला अटक करण्यात आली असून त्याच्या कडून मोबाईल, डिव्हाईस, ईअर फोन पोलिसांनी जप्त केले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या ड्रिमलँड ड्रीमलॅन्ड मार्केट या परीक्षा केंद्रात हा प्रकार घडला असून नांदगाव पेठ पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आला आहे. दीपक चवरे असे अटक करण्यात आलेल्या उमेदवाराचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे. राज्यामध्ये तलाठी भरती परीक्षेच्या तिसऱ्या सत्राची परीक्षा सुरु आहे. अमरावतीमध्ये देखील ही परीक्षा सुरु आहे. या परीक्षा केंद्रावर जात असतांना विद्यार्थाची तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला.
राज्यामध्ये तलाठी भरती परीक्षेचे विविध सत्र राबवण्यात आले आहेत. या परीक्षेमध्ये विविध गैर प्रकार पूढे येत आहे. या पूर्वीही विद्यार्थ्यांच्या हायटेक कॉपी करण्याच्या घटना उघडकीस आल्या आहे. मुंबईमध्ये देखील पवई केंद्राबाहेर गोंधळ झाला होता. त्यानंतर अमरावती येथे देखील हायटेक कॉपीचा प्रकार उघडकीस आला होता.