कोकण पदवीधर संघातील सिंधुदुर्गमध्ये १५ हजार १५४ मतदारांची नोंद मतदारात तिनपटीने वाढ – किशोर तावडे

मतदारांनी ऑनलाईन पेक्षा ऑफलाईनलाच जास्त पसंती दर्शविली. ऑनलाईन पद्धतीमध्ये एकूण १५ हजार १५४ मतदारांपैकी केवळ ६३० मतदारांनी नोंदणी केली तर ऑफलाईन पद्धतीने तब्बल १४ हजार ८१० मतदारांनी नोंदणी केली.

  सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र विधान परिषद कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची मतदार नोंदणी ३० सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत पूर्ण झाली आहे. या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल १५ हजार १५४ एवढ्या पदवीधर व पदविका धारकांनी मतदार नोंदणी केली आहे. यात ६,११६ स्त्री मतदार तर ९ हजार ३८ पुरुष मतदारांचा समावेश आहे. गत निवडणुकीपेक्षा ही मतदार नोंदणी तीन पटपेक्षा जास्त झाली आहे. अशी माहीती जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली.

  गत सन २०१८ मध्ये ही संख्या केवळ ५ हजार ३०८ एवढी होती. १ नोव्हेंबर २०२० पर्यंत पदवी अथवा पदविका पूर्ण केलेल्या पदवीधर नागरिकांचा पदवीधर मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची ६ नोव्हेंबर ही अंतिम तारीख होती. यापूर्वी सिंधुदुर्ग सन २०१८ मध्ये जिल्ह्यात ५ हजार ३०८ पदवीधर मतदार नोंद झाले होते. ती यादी आता तिनपटीने वाढली आहे.

  कोकण पदवीधर मतदारसंघ रद्द केले असून सर्व पदवीधर मतदारांना या काळात नव्याने मतदान नोंदणी करणे बंधनकारक होते. ६ नोव्हेंबर पर्यंत पदवीधर मतदारांना नोंदणी करण्याची संधी होती. या यादीचे प्रारूप मतदार याद्या बनविण्याची छपाई करण्याचा दिनांक २० नोव्हेंबर आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यावर दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२३ पर्यंत असून, दावे व हरकती निकाली काढण्याचा व पुरवणी यादी तयार करण्याचा २५ डिसेंबर २०२३ ही अंतिम तारीख आहे. अंतिम मतदार यादी ३० डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

  कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांची मुदत ७ जुलै २०२४ रोजी संपत आहे. तत्पूर्वी पदवीधर मतदार यादी निवडणूक प्रशासनाने तयार करण्याचे काम हाती घेतले होते.

  ऑनलाईनपेक्षा ऑफलाईनला जास्त पसंती

  कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादी नोंदणीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन पद्धती ठेवण्यात आल्या होत्या. मात्र मतदारांनी ऑनलाईन पेक्षा ऑफलाईनलाच जास्त पसंती दर्शविली. ऑनलाईन पद्धतीमध्ये एकूण १५ हजार १५४ मतदारांपैकी केवळ ६३० मतदारांनी नोंदणी केली तर ऑफलाईन पद्धतीने तब्बल १४ हजार ८१० मतदारांनी नोंदणी केली. ही नोंदणी होण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यकत्यांनीही बरीच मेहनत घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्यांमध्ये सर्वात अधिक सावंतवाडी तालुक्यात ३९९३ मतदारांची नोंदणी झाली आहे. तर सर्वात कमी म्हणजे १ हजार १० मतदारांची नोंदणी दोडामार्ग तालुक्यामध्ये झाली आहे.

  तालुकानिहाय झालेली नोंदणी

  देवगड ९०२ पुरुष आणि ५७७ महिला मिळून एकूण १४७९, वैभववाडी ६६२ पुरुष आणि ३९४ महिला मिळून एकूण १०५६, कणकवली ७४० पुरुष आणि १२६१ महिला मिळून ३००१, मालवण ८५८ पुरुष आणि ६२४ महिला मिळून एकूण १४८२, कुडाळ १२६६ पुरुष आणि ८२५ महिला मिळून एकूण २०९१, वेंगुर्ला ७६३ पुरुष आणि ५६५ महिला एकूण १३२८, सावंतवाडी २२८६ पुरुष आणि १७०७ महिला मिळून एकूण ३९९३ आणि दोडामार्ग ६८६ पुरुष आणि ३२४ महिला एकूण १०१० अशा ९१६३ पुरुष आणि ६२७७ महिला मिळून एकूण १५४४० जणांनी आपली नोंदणी केली आहे

  मतदारांमध्ये तीन पटीने वाढ

  ६२७७ स्त्री तर ९ हजार १६३ पुरुष मतदार

  सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक ३९९३ मतदारांची नोंदणी

  दोडामार्ग तालुक्यात सर्वात कमी १०१० मतदारांची नोंदणी