rain

राज्यामध्ये अनेक ठिकाणी किमान तापमान 13 ते 20 अंश सेल्सिअसच्या दरम्यान पोहोचले आहे. कमाल तापमानात वाढ झाली असून दुपारच्या वेळी उन्हाचा तडाका जाणवत आहे. कमाल तापमानातही वाढ झाली आहे.

    देशासह राज्यातील वातावरणात  बदल होत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, तर काही ठिकाणी थंडीची लाट (Cold Wave) आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस (Rain) आणि धुक्यामुळे किमान तापमानावर परिणाम झाला आहे. त्यामुळे दिवसा उन्हाचा तडाकाही वाढला आहे. आज (2 फेब्रुवारी) राज्यात काही ठिकाणी किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आजपासून पुढचे दोन दिवस राज्यात थंडी वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

    राज्यात मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा परिणाम राज्यातील काही भागात होऊ शकतो. या बदलत्या हवामानाचा परिणाम राज्यातील शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात होत आहे. या वातावरणामुळे शेतीतील पिकांना धोका निर्माण झाला आहे.

    राज्यामध्ये अनेक ठिकाणी किमान तापमान 13 ते 20 अंश सेल्सिअसच्या दरम्यान पोहोचले आहे. कमाल तापमानात वाढ झाली असून दुपारच्या वेळी उन्हाचा तडाका जाणवत आहे. कमाल तापमानातही वाढ झाली आहे. मात्र त्याच वेळी दुपारच्या वेळी उकाडा जाणवत आहे. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी 34 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. या बदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे.

    नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाब क्षेत्र (डिप्रेशन) बुधवारी (ता. 01) रात्री श्रीलंकेच्या पूर्व किनाऱ्याला धडकले. ही प्रणाली नैर्ऋत्य दिशेकडे जात असून, तिच्या प्रभावामुळे तमिळनाडू, केरळ, लक्षद्वीप बेटांवर विजांसह पावसाची शक्यता आहे.या ठिकाणी अनेक भागात ताशी 50 किमी वेगाने वारे वाहू शकतात. त्याचबरोबर मध्य प्रदेशातही काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसू शकतात.