“महाराष्ट्राला अजित पवार रिर्टन्स पार्ट-2 पाहायला मिळेल – काँग्रेस”, शरद पवारांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसची भूमिका काय?

आता मविआतील काँग्रेस पक्षाची प्रतिक्रिया समोर आली आहे. शरद पवार यांच्या विधानाचा सरळसरळ अर्थ असा लावला जाऊ शकतो की महाराष्ट्राला व देशाला अजित पवार रिर्टन्स पार्ट-२ पहायला मिळू शकतो, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

    मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय वेगाने मोठ्या घडामोडी घडत आहेत. तसेच राजकीय उलथापालथी देखील होताहेत. यात आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या एका वक्तव्यामुळे आणखी भर पडण्याची शक्यता आहे. कालपर्यंत अजित पवार (Ajit Pawar) गट यांच्याविरोधात बोलणारे, शरद पवारांनी (Sharad Pawar) आज अचानक यू-टर्न घेत, एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळं सगळेच अंचिबत झाले आहेत. त्यामुळं त्यांच्या गटातील नेते व कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. की पवारांची नक्की भूमिका काय? यावर विरोधकांच्या देखील विविध प्रतिक्रिया येत असताना, आता मविआतील काँग्रेस पक्षाची प्रतिक्रिया समोर आली आहे. शरद पवार यांच्या विधानाचा सरळसरळ अर्थ असा लावला जाऊ शकतो की महाराष्ट्राला व देशाला अजित पवार रिर्टन्स पार्ट-२ पहायला मिळू शकतो, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे. (maharashtra will see ajit pawar return part two congress what is the role of congress after sharad pawar statement)

    वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही

    ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, “कोणत्याही परिस्थितीत भाजपाबरोबर जाणार नाही, ‘इंडिया’ आघाडी बरोबरच राहणार आहे”, असे शरद पवार यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज वाटत नाही. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झालेले त्यांचे सहकारी शरद पवार यांच्या पाया पडतात याचा अर्थ असा आहे की, भाजपाने जी राजकीय घाण केली आहे त्याचे उत्तर अजित पवार रिटर्न्सने मिळू शकते.

    भाजपाकडून विरोधी पक्ष फोडण्याचे पाप…

    भारतीय जनता पक्षाने तोडफोडीचे राजकारण करत विरोधी पक्ष फोडण्याचे पाप केले आहे. भाजपाने आधी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून महाविकास आघाडीचे सरकार पाडले व कटकारस्थान करून एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. सरकार स्थापन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरही तेच केले पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सक्षम व राजकारणाचा दांडगा अनुभव असलेले नेते आहेत. अजित पवार यांच्या गटाला अद्याप अधिकृत मान्यता मिळालेली नाही. शरद पवार यांचे राजकारण पाहता भारतीय जनता पक्षाला ते कात्रजचा घाट दाखवतील, असेही अतुल लोंढे म्हणाले.