Maharashtra Wushu team wins two silvers and one bronze in National Games
Maharashtra Wushu team wins two silvers and one bronze in National Games

    पुणे : गोवा येथे सु्रू असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय  क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाच्या श्रावणी कटके हिने तावलू इव्हेंट ताईजी जेन प्रकारामध्ये रौप्यपदक पटकावले. तर सलोनी जाधव हिने तावलू इव्हेंट नंदाऊ प्रकारात रौप्य पदक आणि विशाल शिंदे याने ८५ किलो वजन गटात कांस्यपदक पटकावले. वुशू खेळामध्ये महाराष्ट्र राज्याला दोन रौप्य व एक कांस्य अशी तीन पदके मिळालेली आहेत.
    प्रशिक्षक प्रतीक्षा शिंदे यांचे मार्गदर्शन
    या स्पर्धेमध्ये सोपान कटके यांनी चिफ ज्युरी म्हणून काम पाहिले. खेळाडूंना सांडा प्रशिक्षक अविनाश पाटील  ताऊलू प्रशिक्षक प्रतीक्षा शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. टीम मॅनेजरपदी महेश इंदापुरे यांनी काम पाहिले. वुशू हा क्रीडा प्रकार सांडा व ताऊलू या दोन प्रकारांत खेळला जातो. महाराष्ट्र शासनाकडून विजयी खेळाडूंना सुवर्णपदक सात लाख, रौप्य पदक पाच लाख, कांस्यपदक तीन लाख रुपये रक्कम बक्षिस  देण्यात येणार आहे.
    खेळाडूंना दिल्या शुभेच्छा
    ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी सदाशिव झेंडे (माजी सनदी अधिकारी), चिफ दी मिशन स्मिता यादव, शिरोळे मॅडम, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगांवकर यांचे खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले. तसेच, धनंजय भोसले, निलेश जगताप, अनिल वरपे , उदय पवार , क्रीडा व युवक सेवा संचनालयाचे पाटील, भाग्यश्री बिले, दीपाली बोराडे, शंकर भास्करे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.